happy-holi-2022-indian-festival-akl: सुगंधी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत खंडेलवाल महिला मंडळाने केली आनंदाची धुळवड साजरी…




नीलिमा शिंगणे- जगड

अकोला : भारतीय संस्कृतीत सण उत्सव साजरे करण्याला अनन्य साधारण महत्व आहे. त्यातच फाल्गुन मासात येणारा होळी सण. होळीमध्ये वाईट विचार आणि कृतीचे दहन केले जाऊन सुविचारांची पेरणी केली जाते. होळी निमित्त रंग खेळण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र, कालांतराने रंगपंचमी, धुळवड खेळात नैसर्गिक ऐवजी रासायनिक रंगांचा वापर होत गेला. त्यामुळे ही परंपरा लोप पावण्यास सुरुवात झाली. आज पर्यावरण सरक्षण महत्व जाणवू लागल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक रंग अथवा फुलांची उधळण करत रंगत्सव साजरा होताना दिसत आहे. अकोला शहरात देखील राजस्थानी खंडेलवाल महिला मंडळ तर्फे एका तपापासून फुलांची होळी खेळल्या जाते. यानिमित्त पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि  नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी होत असल्याचे चित्र अकोल्यात दिसत आहे.




सुगंधी फुलांचा वापर



बाजारात मिळणाऱ्या भेसळ आणि रासायनिक रंगामुळे रंगउत्सवाच महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे. या रासायनिक रंगांपासून बचाव होण्यासाठी अकोल्यातील राजस्थानी महिलांनी उपाय शोधला. अन् सुगंधी फुलांनी होळी खेळण्यास सुरुवात केली. आज प्रत्येकाला पर्यावरणाचे महत्त्व कळल्याने मोठ्या संख्येने महीला या उत्सवात सहभाग घेतात. ही होळी रंगांनी नाही...पाण्यानी नाही तर केवळ आणि केवळ...फुलांच्या सुगंधी पाकळ्यांनी खेळल्या जाते.  




पारंपरिक लोकगीत, नृत्य आणि होळी




होळीच्या पारंपारिक लोकगीतांवर नृत्य करीत  या महिलांनी 'बृज की होली'  चा आनंद लुटला. श्रीराधाकृष्ण यांची वेशभुषा केलेल्या महिला या उत्सवाचे आकर्षण ठरले. अकोल्यातील खंडेलवाल महिला मंडळ गेल्या 12 पेक्षा अधिक वर्षापासून ही नैसर्गिक फुलांची होळी आयोजित करतात. या उत्सवात सर्व स्तरातील आणि वयोगटातील महिला व पुरुष मंडळी सहभागी होवून आनंदोत्सव साजरा करतात. 



टिप्पण्या