fire-ice-factory-Jatharpeth-akola: जठारपेठ मधील बर्फ कारखान्याला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

(गणेश नगर भागात गुरुवारी सायंकाळी आगीची घटना)



 नीलिमा शिंगणे जगड

अकोला: शहरातील जठारपेठ भागातील बर्फाचा कारखान्याला आज शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली.अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.आतापर्यंत आग विझविण्यासाठी 4 टँक पाणी लागले असल्याची प्राथमिक माहिती आहे.



या आगीने रौद्ररूप धारण केले आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली,याचे कारण अद्याप समजले नाही.मात्र,हा कारखाना बऱ्याच वर्षापासून बंद असल्याने येथील भंगार साहित्यामुळे आग लागली असावी,असा कयास प्रत्यक्षदर्शिनी काढला आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून,येथील लाकूड ब लाकडाचा भुसा जाळून खाक झाला आहे. घटनास्थळी मनपा अग्निशमन दल व पोलीस विभाग कर्मचारी अधिकारी पोहचले आहेत.



गणेश नगर भागात घटना


गणेश नगर भागात गुरुवारी सायंकाळी आगीची घटना



गुरुवारी सायंकाळी डाबकी रोड भागातील गणेश नगर येथील एका अपार्टमेंट मधे आग लागण्याची घटना घडली. या आगीत तळघरातील इलेक्ट्रिक मीटर जळले,अशी प्राथमिक माहिती आहे.अग्निशमन दलाची गाडी आणि महावितरण कर्मचारी वेळेवर पोहचल्याने येथील पुढील अनर्थ टळला,अशी चर्चा प्रत्यक्षदर्शीमधे होती. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.


गणेश नगर भागात गुरुवारी सायंकाळी आगीची घटना घडली होती.




टिप्पण्या