- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार करून,तिचा बेकायदेशीर गर्भपात घडवून आणणाऱ्या आरोपीस आज (२२ मार्च ) पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्या न्यायालयाने भा. द. वी. कलम ३७६ (२) (एन) व पॉक्सो कायदा कलम ५-६ मध्ये १० वर्षे सक्त मजुरी व रु १००००/- दंडाची शिक्षा ठॊठावण्यात आली.
मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात मुख्य आरोपी प्रवीण उर्फ तुकाराम कपुरचंद चव्हाण (वय २४ वर्ष रा. खंडला ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) यांचे विरुद्ध त्याच्या नातेवाईक असलेल्या अल्प वयीन (१० वर्षे) मतिमंद बालिकेवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती करून गैर कायदेशीर मार्गाने तिचा गर्भपात केल्याचा आरोप होता, अन्य आरोपी त्याची बहीण दिपाली गोपाळ चव्हाण, गणपत जेजराव सोळंके व डॉ दयाल रामजी चव्हाण यांनी गर्भपात करण्यास मदत केल्याचा त्यांचेवर आरोप होता, सबळ पुराव्याअभावी त्यांच्याविरु्ध आरोप सिद्ध न झाल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात आले.
आरोपी प्रवीण उर्फ तुकाराम कपुरचंद चव्हाण हा पिडीतेचे आई वडील कामाकरता बाहेर जात असत तेव्हा पीडितेवर अत्याचार करीत असे, पीडिताला पोटात दुखत असल्याने आरोपी अन्य आरोपी सोबत पीडितेला दवाखान्यात घेऊन गेले व तिचे आई वडीलास खोटी माहिती देऊन गर्भपात करण्यासाठी त्यांची संमती प्राप्त केली. परंतु पिडीते कडून आरोपी प्रवीण उर्फ तुकाराम कपुरचंद चव्हाणच्या दुष्कृत्याबाबत माहिती कळल्यानंतर आरोपी विरुद्ध सदर फिर्याद दि १८/०६/२०१८ रोजी दाखल करण्यात आली. भा. द. वी. कलम ३७६ (२) (एन) व पॉक्सो कायदा कलम ५-६ व इतर कलमानुसार दोषारोप पत्र सादर करून विशेष सत्र खटला प्रकरण न्याय प्रविष्ट होते, आरोपी प्रवीण उर्फ तुकाराम कपुरचंद चव्हाण हा फरार असल्यामुळे इतर आरोपी विरुद्ध खटला सुरू करण्यात आला, नंतर प्रवीण उर्फ तुकाराम कपुरचंद चव्हाण याला अटक करण्यात येऊन त्याचे विरुद्ध पुरवणी दोषारोप पत्र सादर करण्यात आले व दोन्ही प्रकरणात एकत्रित न्यायनिवडा करण्यात आला.
सदर प्रकरणातील मुख्य साक्षीदार म्हणजे पीडिता, तिचे वडील फितूर झाले तरीही त्यांच्या पूर्वी दिलेल्या बयान व अन्य साक्षी पुराव्यांच्या आधारावर सदर न्याय निवडा करण्यात आला. प्रकरणात अभियोग पक्षा कडून १९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, साक्षी पुरावे लक्षात घेता वि. पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शायना पाटील यांच्या न्यायालयात आज आरोपीस भा. द. वी. कलम ३७६ (२) (एन) व पॉक्सो कायदा कलम ५-६ मध्ये १० वर्षे सक्त मजुरी व रु १००००/- दंडाची शिक्षा ठॊठावण्यात आली, दंड न भरल्यास २ महिन्याची अतिरिक्त शिक्षा आरोपीस भोगावी लागेल. तसेच भा. द.वी. कलम ५०६ मध्ये ७ वर्ष सक्त मजुरी व रू ५०००/- दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची अती रिक्त शिक्षा ठोठावली सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत.
सरकार पक्षा कडून सुरवातीला सरकारी अभीयोक्ता मंगला पांडे यांनी व नंतर सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली, संदीप मडावी व धनंजय रत्नपारखी पो. उप. नी. यांनी प्रकरणाचा तपास केला होता नारायण शिंदे एन पी सी व सी एम एस च्या काझी यांनी पैरावी म्हणून काम पाहिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा