bamboo-farming-pashabhai-patel: पर्यावरण रक्षण व इंधनासाठी बांबूची शेती शेतकऱ्यांनी करावी - पाशाभाई पटेल






ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: पर्यावरण रक्षणासाठी तसेच इंधनासाठी बांबूची शेती मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी करावी. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी तसेच पर्यावरणपूरक अशा या शेती मुळे देशाचे कल्याण होईल व रोजगाराची संधी प्राप्त होईल, अशी माहिती देऊन लातूर येथे बांबूपासून तयार केलेल्या कारखान्याची माहिती देऊन एप्रिल महिन्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते या कार्याला गती देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय कृषी या आयोगाचे सदस्य व भाजपा नेते पाशा भाई पटेल यांनी दिली.




स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदमध्ये ते आज  बोलत होते. 






आसाम मध्ये नेदरलँड या राष्ट्र सोबत स्वदेशी बनावटीच्या कारखान्याचा बांबूपासून इंधन कारखाना सुरू होणार आहे. यासंदर्भात  पाहणी केली तसेच भारतामध्ये 16000 जातीचे बांबू निर्माण होत आहे. महाराष्ट्रात केवळ नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यात बांबूची शेती होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू ची शेती होते, आता मोठ्या प्रमाणात शेती होणार यासाठी जनजागृती करण्यासाठी अकरावी बांबू परिषद आयोजित केल्याची  माहिती पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.  




ऑक्सिजन निर्मिती वाढवण्याची गरज सांगून कार्बन-डाय-ऑक्‍साईड मुळे अनेक आजार सोबत जग संकटात सापडला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी आपण अभियान सुरू केल्याचे पटेल यांनी यावेळी सांगितले. 



प्रत्येक जिल्ह्यात एक एकर शेती या बांबू निर्माण करण्यासाठी देण्यात येत आहे. सहकारात सुद्धा बांबूची शेतीचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर वर्षांनंतर बांबू हा वन खात्यातून काढून बांबू गवत आहे, असे सांगून शेतकऱ्यांचा कल्याण केला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढविण्यासाठी अनेक योजना सरकार करीत असल्याचे पटेल यांनी याप्रसंगी सांगितले. 




यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस माधव मानकर, रमेश खोपरे, गिरीश जोशी अक्षय जोशी, मोहन पारधी, अतुल अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.



टिप्पण्या