- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
anger-of-nabhik-community-over- raosaheb-danve: नाभिक समाजाचा रावसाहेब दानवे यांच्यावर रोष; अकोल्यात निषेध मोर्चा व जोडेमार आंदोलन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
निषेध मोर्चा: अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर रोष व्यक्त करताना नाभिक समाज बांधव
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरले. यामुळे संपूर्ण राज्यात नाभिक समाजाने याबाबत रोष व्यक्त केला आहे. दानवे यांच्या निषेधार्थ आज अकोला नाभिक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जोडेमार आंदोलन केले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई, शाखा जिल्हा अकोला, नाभिक दुकानदार संघटना जिल्हा अकोलाचे पदाधिकारीसह समाज बांधव मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रावसाहेब दानवे यांच्या वर गुन्हे दाखल करावे
रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नाभिक समाजाचा अपमान झाला असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी नाभिक समाजाने यावेळी केली. ही मागणी सरकार दरबारी पोहचिण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर नाभिक समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यानंतर दानवे यांच्या प्रतिमेवर जोडे मारून नाभिक समाजाने आपला रोष व्यक्त केला. दानवे यांच्यावर गुन्हे दाखल न केल्यास नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजावर अपशब्द वापरल्याबद्दल नाभिक समाज बाधवाचा अपमान झाला असून, त्यांनी केलेले वक्तव्य हे मानवाधिकाराचे उल्लंघन केले असून, त्याचेवर गुन्हे दाखल करून नाभिक समाजास न्याय देण्यात यावा,अशी मागणी निवेदनात केली आहे.
राज्यभर तीव्र आंदोलन करणार
केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील चर्चासत्रात राज्यातील आघाडी सरकार टीका करताना न्हाव्यांची (नाभिक) उपमा दिली. हा सकल नाभिक समाजाचा अपमान असून, रावसाहेब दानवे यानी मानवाधिकाराचे उल्लंघन केले आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल करून सकल नाभिक समाजास न्याय देण्यात यावा, दानवेच्या या वक्तव्याने संपूर्ण नाभिक समाज दुखावला असून, अशा प्रकारचा अपमान समाज कधीही खपून घेणार नाही,असे निवेदनात नमूद केले आहे.
आपल्या भारत देशात 12 बलुतेदार जाती या व्यवसायावरून आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने जाहीर सभेमध्ये एखादया समाजाचे पारंपारिक व्यवसायाबद्दल वक्तव्य करणे म्हणजे कमी दर्जाची वागणूक देणे होते, तरी दानवे यांच्यावर गुन्हे दाखल न केल्यास नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन करणार, अशी चेतावणी निवेदनातून श्री संत सेना महाराज बहुउददेशीय सेवा समिती नाभिक समाज दुकानदार संघटना बोरगाव मंजू (अकोला) यांनी दिली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा