akot-court-news-crime-mseb-msedcl: शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचा-यास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिन्याचा कारावास व दंड


                                           संग्रहित चित्र




नीलिमा शिंगणे जगड

अकोला: शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचा-यास मारहाण केल्याप्रकरणी अकोट न्यायलयाने आरोपीस सहा महिन्याचा साधा कारावास व द्रव्यदंडची शिक्षा ठोठावली आहे. 




अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी अकोट शहर पो.स्टे. अप नं. 120/18 मधील आरोपी निलेश प्रमोद काटोले (वय अंदाजे 30 वर्ष रा. गोलबाजार, अकोट, जि. अकोला) या आरोपीने एम.एस.ई.बी.एम.एस.ई. डि.एस.एल विद्युत महावितरण, अकोट शहर विभाग येथील कर्मचारी व या प्रकरणातील फिर्यादी योगेश पांडुरंग दिये हा इतर कर्मचा-यासोबत दिनांक 20 मार्च 2018रोजी विज बिलाची थकबाकी वसुल करण्याकरिता गेले असता या प्रकरणातील आरोपी निलेश प्रमोद काटोले याने थकीत विज बिल वसुलीच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासंबंधी रिपोर्ट दिल्यावरून या प्रकरणात अकोट सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला. 



या सत्र खटल्यामध्ये आरोपीविरुध्द भा.दं.वि.चे कलम 353 प्रमाणे फिर्यादी लोकसेवक आपले कर्तव्य बजावत असतांना व कर्तव्य कायदेशीरपणे पार पाडत असताना लोकसेवकास प्रतिबंध करण्याच्या किंवा धाकाने परावृत्त करण्याच्या उद्देशाने जो कोणी त्याच्यावर फौजदारी पात्र बलप्रयोग करेल असा भा.दं.वि.चे कलम 353 प्रमाणे गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने या आरोपीला विद्यमान न्यायालयाने 353 भा.द.वि. या कलमार्तगत शिक्षापात्र गुन्हयासाठी आरोपीस 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची आणि रु.5,000/- इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने द्रव्यदंड न भरल्यास त्याने दोन महिन्यांचा अधिकचा कारावास भोगावयाचा आहे. असा न्यायनिर्णय पारित केला आहे.


या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, फिर्यादी योगेश पांडुरंग दिघे (रा. उज्वल नगर, दर्यापूर रोड, अकोट, व्यवसाय नोकरी महावितरण अकोट शहर विभाग,) यांनी दिनांक 20 मार्च 2018 रोजी सकाळी 10.15 मिनिटांनी फिर्यादी व त्याचे सहकारी बीज बिल वसुलीकरिता ग्राहक पि.एल.काटोले रा. गोलबाजार अकोट, ग्रा.क. ३१८७३०१००४२६ यांचेकडे थकीत असलेले रू.3771/- चे बिल थकीत असून भरणा करणेबाबत विचारणा केली असता, आरोपी निलेश काटोले घरातून आले व फिर्यादी योगेश दिघे याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली. सदरहु काम हे शासकीय स्वरूपाचे असून आरोपी निलेश काटोले यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सदरची शिवीगाळ व धक्काबुक्की आरोपी निलेश काटोले यांनी फिर्यादी योगेश दिघे यांना शिवीगाळ त्यांचे सहकारी धनराज हिवरे, चेतन गणगणे, सुनिल सुलताने, मंगेश कावरे व  रूपेश तायडे यांचा समक्ष केली आहे. त्यावरून फिर्यादीने पो.स्टे. अकोट शहर येथे फिर्याद नोंदविली. 



या फिर्यादी वरून तपास करून तपास अधिकारी साहायक पोलीस उपनिरिक्षक विजय सिरसाट अकोट शहर पो.स्टे. यांनी आरोपी विरुद भादंवि चे कलम 353,294,504,506 प्रमाणे आरोपीविरूध्द दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या सत्र खटल्यामध्ये सरकारपक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी एकूण 5 साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयामध्ये नोंदविल्या. आरोपी विरूध्द गुन्हा सिद्ध झाल्याने दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर विद्यमान कोर्टाने आरोपीला  शिक्षा ठोठावली. 



सरकारपक्षातर्फे या प्रकरणी सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबंधी युक्तीवाद केला की, आरोपीविरूध्द असलेला गुन्हा गंभीर आहे. कायद्यात सुधारणापूर्वीच्या तरतुदीनुसार का होईना, आरोपीस जास्तीत जास्त पूर्ण कालावधीची म्हणजे दोन वर्षापावेतोच्या कारावासाची आणि मोठया द्रव्यदंडाची शिक्षा करावी, जेणेकरून समाजात योग्य संदेश

जाईल आणि अशा प्रकारचे गुन्हे करण्यापूर्वी लोक विचार करतील. विद्यमान न्यायालयाने देखील निकाल पत्रामध्ये नमूद केले की, अशा सिध्द गुन्हयांत आरोपीस अनाठायी दयाबुध्दी दाखवणे म्हणजे अशा समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यासारखे होईल. यातून प्रामाणिकपणे काम करणा-या लोकसेवकांची संख्या आधीच दुर्मीळ व दुर्बळ होत चाललेली कर्तव्यनिष्ठा अधिकच हतोत्साहित होईल. शिवाय, आहे तेवढे वीज देयक नियमित भरणा-या लुप्त होत जाणा-या उरल्यासुरल्या प्रजातीची क्रूर थटटा केल्यासारखेही होईल. 


 

या प्रकरणाचा तत्कालीन तपास अधिकारी म्हणून साहायक पोलीस उपनिरिक्षक महेंद्र गवई यांनी तपास केला होता. आरोपीविरूध्द  दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर विद्यमान न्यायालयाने आरोपीला उपरोक्त 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि रू. 5,000/- दंडासह ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून ए.एस.आय मोहन फरकाडे यांनी सहकार्य केले.


टिप्पण्या