akola-district-session-court-crime: शाळेत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या आरोपीस विनयभंग प्रकरणी सश्रम कारावास





ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: शाळेमध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेल्या आरोपीने पीडित फिर्यादी पाणी भरत असताना विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ देत जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी आरोपीस दोषी ठरवत न्यायलयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठविली.



आज दिनांक २४.०३.२०२२ रोजी वि. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. वाय.जी. खोब्रागडे यांनी विशेष सत्र खटला कमांक १४२/२०१८ या प्रकरणात आरोपी भगवान हरीभाउ खराटे, वय ५० वर्ष, व्यवसाय नोकरी, रा. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला यास पिडीत फिर्यादी हिला जातीवाचक शिवीगाळ, जिवाने मारण्याची धमकी व विनयभंग प्रकरणी आरोपावरून भा.द.वि कलम ३५४-अ नुसार दोषी ठरवुन आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास व रुपये १५,०००/- दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महीन्याची सश्रम कारावास, भा.द.वि कलम ३५४-ब नुसार दोषी ठरवुन आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास व रुपये १५,०००/- दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महीन्याची सश्रम कारावास, तसेच अट्रॉसिटी अक्ट कलम ३(१) (डब्लु) (iii) ३(२) (व्हीए) नुसार दोषी ठरवुन आरोपीस ३ वर्षाची सश्रम कारावास व रुपये १५,०००/- दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महीन्याची सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. तसेच पिडीतेला दंड रकमेतुन रु.४०,०००/- नुकसान भरपाई दिली.आरोपी हा शाळेवर शिपाई या पदावर कार्यरत आहे हे महत्वाचे.




थोडक्यात हकीकत अशी चान्नी पोलीस स्टेशन येथे दिनांक २०.०७.२०१८ पिडीता हिने आरोपी विरुध्द रिपोर्ट दिला की, रात्री ११.०० वाजता दरम्यान पीडीता ही टाकीतुन पाणी काढत असतांना आरोपीने मागुन येवुन फिर्यादीचा विनयभंग केला.




सदरच्या रिपोर्ट वरुन तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापूर श्री. सोहेल नुरमोहम्मद शेख यांनी तपास करुन आरोपी विरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट केले.




सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आरोपीच्या वतीने एक बचावाचा पुरावा नोंदविण्यात आला. अतिरिक्त सरकारी वकील श्री राजेश आकोटकर यांनी प्रभावीपणे सरकार पक्षाची बाजु विद्यमान न्यायालयात मांडली. तसेच पैरवी अधिकारी हे कॉ. उकर्डा जाधव व पो.कॉ. मोहन ढवळे यांनी सहकार्य केले.



टिप्पण्या