akola-court-crime-father-daughter: वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या आरोपीस आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा


 


नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: माना पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आलेल्या एका गुन्ह्यात आरोपीला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अनैसर्गिक शारीरिक शोषण केल्या प्रकरणी विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात भा. द. वी. कलम 376 (2) (एफ) (1) (एन) व पॉक्सो कायदा कलम  5-6 मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व भा. द. वी. कलम 376 (3) मध्ये 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व विविध कलमा अंतर्गत एकूण रू 275000/- चा दंड ठोठावण्यात आला, दंड न भरल्यास प्रत्येक कलमामध्ये अतिरिक्त 6 महिन्याची शिक्षा आरोपीस भोगावी लागेल. 



पिडीत बालिकेची आई फितूर


या प्रकरणात, आरोपी त्याच्या अल्पवयीन असलेल्या मुली सोबत जबरदस्ती अनैसर्गिक अत्याचार करीत असे, पिडीतेने दिलेल्या जबाब नुसार वडील असलेल्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात पिडीत बालिकेची आई फितूर झाली तरी पिडीतेची साक्ष, इतर साक्ष पुरावेचे आधारावर आरोपीस सदर घृणीत कृत्याबद्दल दोषी धरण्यात येऊन शिक्षा ठोठावण्यात आली. माना पो. स्टे. येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपीला



मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली


सरकार तर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले होते. ए. पी. आय. संजय खंडारे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. विजय विल्हेकर व सी एम एस चे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधीकारी म्हणून काम पाहिले.

टिप्पण्या