- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
agitation-professors-doctors-akola: प्राध्यापक डॉक्टरांचे प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र;आजपासून आरोग्यसेवा बंद, आपत्कालीन रुग्ण सेवा सुरू राहणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला:आंदोलनात सहभागी प्राध्यापक डॉक्टर
नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध मागण्या संदर्भात राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. अकोल्यात देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अध्यापकांनी आंदोलन तीव्र करीत आजपासून आरोग्यसेवा बंद केली आहे.
दीड महिना पेक्षा अधिक कालावधीपासून राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर यांनी प्रशासकिय कामकाज सह शैक्षणिक कामकाजावर बहिष्कार घातला आहे. शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा,अशी अपेक्षा संघटनेची होती. जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रलंबित मागण्या सोडवण्यात आल्या नसल्याने वैद्यकीय अध्यापकांनी आंदोलन तीव्र केले आहे.
काय आहेत मागण्या
ऐच्छीक एनपीए व विविध भत्ते, वैद्यकीय अभ्यास, पदव्युत्तर भत्ता, जोखीम भत्ता, विशेष भत्ता, सातव्या वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने तरतूद करण्यात यावी,
करियर ॲडव्हांस स्कीम लागू करणे, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेश करणे, प्रोत्साहनपर वेतनवाढ देणे, करार पध्दतीवरील नियुक्तीचा आदेश रद्द करण्यात यावा,
सरळसेवा भरती प्रक्रियेत तात्पुरत्या वैद्यकीय प्राध्यापकांना प्राधान्य देण्यात यावे,
अध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावे,
जनआरोग्य योजना प्रोत्साहन भत्त्याची
अमलबजावणी करणे, नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या
अध्यापकांच्या प्रतिनियुक्तया रद्द करणे, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग
सचिव यांना निलंबीत करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
आपत्कालीन व कोविड रुग्णसेवा सुरू राहणार
आंदोलन दरम्यान आपात्कालीन व कोविड रुग्णसेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे.
विद्यार्थी व रुग्णांना फटका
या आंदोलनामुळे वैद्यकीय महाविद्यालय परीक्षार्थी व सामान्य रुग्णाना फटका बसत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा