प्रशासकीय कामकाज पूर्णकरून केलं गीताच चित्रीकरण...
ॲड. नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: महाराष्ट्राचे आरध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पर्वावर आज अकोला जिल्हाचे निवासी उप जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी आपल्या संकल्पतेतून आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली.एरव्ही प्रशासकीय अधिकारी म्हंटले म्हणजे चाकोरीबध्द जीवन जगणारे. मात्र, प्रा.खडसे यास अपवाद आहेत. प्रा.खडसे निरंतर नाविन्यपूर्ण करत असतात.जे समाजाला प्रामुख्याने तरुणाईला प्रेरणादायी असतं.मग प्रशासकीय सेवेत येवू पाहणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन वर्ग असो, जल अभियान असो की निरोगी आरोग्य साठी मिशन बायसिकल असो. सर्वकाही प्रेरणादायकच. यावेळी देखील प्रा.खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एक गीत स्वतः संगीतबद्ध करून आपल्या जादुई आवाजाचा स्वरसाज चढवित ज्वाजल्य इतिहास नवपिढी समोर ठेवला.
याआधी कोरोना लसीकरण जागृती गीत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित व शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी व्हावी, याकरिता शिवरायांना समर्पित एक गीत प्रा. खडसे यांनी प्रदर्शित केलं आहे. खडसेंनी ' माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली ' अशी शब्दरचना असलेलं गीत संगीतबद्ध करून आज शिवजयंतीच्या पर्वावर लोकांना समर्पित केलं आहे. संजय खडसे यांनी याआधी देखील कोरोना लसीकरणाला वेग मिळावा; लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी सुद्धा गीत गायलं होत,हे येथे उल्लेखनीय आहे.
शिवरायांचे कार्य नव्यापिढीपर्यंत पोहचावे
गाण्याचा छंद जोपासणाऱ्या प्रा. खडसे या अधिकाऱ्यांनी प्रशासकिय कामकाज चोख बजावत अनेक सामाजिक उपक्रमात मोलाची भूमिका बजावली आहे. अशातच आज प्रशासकीय अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांवर गायलेलं आणि चित्रबद्ध केलेलं हे कदाचित आजवरच्या इतिहासात पहिलेच गाणे असावे.!
प्रशासकीय कामपूर्ण करून सुट्टीच्या दिवशी या गाण्याचं चित्रीकरण व यासंबंधी अन्य कार्य एका महिन्यात पूर्ण करून आज शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आले.
या गीताचे लेखन मुकुंद कुमार यांनी केलं आहे. प्रा. संजय खडसे यांनी व त्यांच्या पत्नी नीता खडसे यांनी हे गीत गायले, तर नृत्य दिग्दर्शन रहीम शेख आणि मोहसीन यांनी केले आहे.
या गाण्याचे चित्रीकरण अकोला जिल्ह्यात करण्यात आले आहे. सर्व कलाकार हे स्थानिक आहेत. विशेष म्हणजे प्रा. खडसे यांच्या मातोश्री देखील यात सहभागी झाल्या आहेत.
शिवरायांचे कार्य नव्यापिढीपर्यंत पोहचावे आणि समाज प्रबोधन व्हावे, याकरीता गीत तयार करण्यात असल्याचे प्रा संजय खडसे यांनी सांगितले आहे.
शानदार विमोचन सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ, अकोला यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली’, या गिताचे शानदार विमोचन करण्यात आले.
जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचित्रा पाटकर या अध्यक्षस्थानी होत्या. तर उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, प्राचार्य डॉ. राधेश्याम सिकची, प्रा. डॉ. सुहास उगले, गजानन नारे, अनंत खेळकर, किशोर बळी , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, गायिका निता खडसे, दिग्दर्शक व गितकार- संगितकार मुकुंदकुमार नितोने, अधीक्षक मिरा पागोरे, गजानन महल्ले तसेच अन्य कलावंत, नृत्य दिग्दर्शक, कलारसिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गिताच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. हे तसेच गिताचे व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. यावेळी गायक तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, गायिका निता खडसे, संकलक विश्वास साठे, नृत्य दिग्दर्शक रहिम शेख, मोहसीन शेख व त्यांचे सहकारी तसेच सर्व कलावंत तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खडसे यांनी केले व गिताच्या निर्मिती मागील भावना सांगितल्या. दिग्दर्शक मुकुंद नितोने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा