Nawab Malik- resigns- bjp- Akola: नवाब मलिक राजीनामा द्या! महाविकास आघाडी विरोधात भाजपने थोपाटले दंड

   निदर्शने देताना भाजपा पदाधिकारी व       कार्यकर्ते




ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: देशद्रोही दाऊद इब्राहिम सोबत संबंध ठेवणारे, बँक घोटाळे करणारे नवाब मलिक यांची शिवाजी महाराजांच्या माऊलीची तुलना करणे म्हणजे शिवभक्तांचा अपमान करणे आहे. अशा तत्वांचा समर्थन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार दाऊद इब्राहिम याचा जयकार करत आहे, असा आरोप आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला.




भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनायक जयप्रकाश नारायण चौक येथे महाराष्ट्र शासनाने लोकशाहीचे संकेत म्हणून  कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा यासाठी निदर्शने आंदोलनात व  मुंबईत  बाँबस्फोट घडवून आणणारे दाऊद इब्राहिम  यांच्या संपत्ती खरेदी करणारे व बँक घोटाळे करणार्‍या संरक्षण देणाऱ्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात निदर्शने कार्यक्रमात ते बोलत होते. 






यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. तसेच नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.





कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज खासदार संजय धोत्रे, जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, किशोर पाटील,संजय गोडफोडे अक्षय गंगाखेडकर, चंद्रशेखर पांडे, संजय गोडा, संजय जिरापुरे, डॉक्टर विनोद बोर्डे, अंबादास उमाळे, राजेंद्र गिरी,गणेश अंधारे,निलेश नीनोरे , अमोल गोगे, धनंजय धबाले, अमोल गीते, दिलीप मिश्रा, मनोज शाहू, आकाश ठाकरे, प्रशांत अवचार, विजय इंगळे, अजय शर्मा, रंजीत खेडकर, बाल टाले, दीप मनवानी, रामदास सरोदे, सुमन  गावंडे, वैशाली शेळके, गीतांजली शेगोकार, सागर शेगोकार, हरीश काळे ,संदीप गावंडे, अर्चना नावकार, पल्लवी मोरे, रश्मी अवचार, शारदा ढोरे, अर्चना चौधरी, उज्वल बामनेट, टोनी जयराज, नितीन राऊत, पवन पाडिया, एडवोकेट देवाशीष काकड, संतोष पांडे, उमेश गुजर, माधव मानकर, चंदा शर्मा, राहुल देशमुख,सिद्धार्थ शर्मा, हेमंत शर्मा ,केशव पोतदार, शितल जैन, हरीश आलमचंदानी, हिरा कृपलानी, गिरीश जोशी, रंजना विंचनकर, शाम विंचनकर, तुषार भिरड,  जस्मीत ओबराय, अभिजीत बांगर, पवन महल्ले, रमेश करियार, साधना येवले, बाळू परवर, सुनील भाटे, चंद्रकांत रुपारेल, सुनील कांबळे, रुपेश यादव ,आनंद कदम,लाला जोगी, विक्की ठाकुर, अनिल करडेकर , आनंद बलोदे, सागर तिवारी, रामदास सरोदे ,राजीव थोरवे ,बाळू ऊपवट गोपाल मुळे, राजेश चौधरी, निकिता देशमुख, साधना येवले, मनीषा भुसारी, सारिका देशमुख सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.






सातत्याने द्वेषपूर्ण राजकारण करून महा विकास आघाडीने 145 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. टीकाटिपणी करणाऱ्या रवी राणा, किरिट सोमय्या, नारायण राणे, नीतेश राणे यांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. अनेक विकास कामे रद्द केली. अकोला महानगरातील सुपर स्पेशलिटी  हॉस्पिटल सुरू केले नाही, क्रीडा संस्कृती भवन निधी दिला नाही, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निधी थांबवण्यात आल्या, भेदभाव करून सुडाचे राजकारण केले. हिंदुत्व सोडून शिवसेना तत्वांचा समर्थन करण्यात लागली आहे. खरं हिंदुत्वाचा स्वरक्षण भारतीय जनता पक्ष करीत असल्याचे सांगून भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकार अनेक प्रकरणात दोषी आहे, असे देखील याप्रसंगी अग्रवाल म्हणाले. 




टिप्पण्या