chess-championship-sport-akola: ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे:चार दिवसीय राज्यस्तरिय बुद्धिबळ चाचणी स्पर्धेस प्रारंभ; सर्वोच्च मानांकन प्राप्त संस्कृती वानखडे व अक्षय बोरगावकर सहभागी




ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला:आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेत नाव लौकिक संपादन करण्यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहाय्य करून त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.अशा क्रीडा स्पर्धा मधून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल व यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.



ऑल इंडिया चेस फेडरेशन व महाराष्ट्र चेस असोसिएशन अंतर्गत अकोला महानगर डिस्टिक चेस असोसिएशन व कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना क्रीडा क्षेत्रात बुद्धिबळ या खेळाची माहिती व्हावी, यासाठी लोकनेते स्व. वसंतराव धोत्रे यांच्या जयंती निमित्त स्थानीय कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात चार दिवसीय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेस थाटात प्रारंभ करण्यात आला.





या प्रारंभ सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमूख,आ गोवर्धन शर्मा,महापौर अर्चना मसने, अनुप धोत्रे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, उपसभापती नीळकंठ खेडकर,प्रा धैर्यवर्धन पुंडकर,प्रशांत देशमुख,मुख्य आरबीटेटर प्रवीण ठाकरे,विवेक सोहनी, प्रणय गोखले,जेष्ठ आरबीटेटर विकास भावे, जयंत मसने,अकोला महानगर डिस्ट्रिक असोचे अध्यक्ष संदीप फुंडकर,सचिव जितेंद्र अग्रवाल, बाजार समिती आडतीया मंडळाचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक चंद्रशेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



लोकनेते स्व वसंतराव धोत्रे प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या शाल श्रीफळ देत सत्काराने या चार दिवसीय स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा करीत स्व.वसंतराव धोत्रे यांच्या शैक्षणिक,सामाजिक एवं कृषी विषयक कार्याचा आढावा घेतला. यावेळी आ शर्मा, कटियार, देशमुख यांनी मार्गदर्शन केले.  





मुख्य बुद्धिबळ खेळाचा प्रारंभ करण्यात आला. या खेळाचा प्रारंभ आ.गोवर्धन शर्मा व हर्षवर्धन देशमुख यांच्यात तर महापौर अर्चना मसने व बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी एकेक चाल खेळून या स्पर्धेचा प्रारंभ केला.यावेळी बुद्धिबळपटू संस्कृती वानखडे तथा अक्षय बोरगावकर उपस्थित होते.



या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक सभापती शिरीष घोत्रे यांनी करून अयोजना मागील भूमिका स्पष्ट केली.संचालन प्रा मोहन खडसे यांनी तर आभार असो चे अध्यक्ष संदीप फुंडकर यांनी मानले.



यावेळी प्रभजितसिंह बछर,बाजार समितीचे संचालक प्रकाशराव काळे, सुनील परनाटे, गजानन पुंडकर,रमेशचंद्र चांडक, सुरेश सोळंके, ज्ञानेश्वर महल्ले,अभिमन्यू वकटे,मुकेश मुरूमकार, चंद्रशेखर खेडकर,रश्मी अवचार, बाबुराव गावंडे, विठ्ठलराव चतरकर, विद्या गावंडे, प्रमोद लाखे,सुनील मालोकर,राजेश बेले, देवेंद्र देवर,वर्षा गावंडे,चंदू चौधरी समवेत बाजार  समितीचे अधिकारी,कर्मचारी,स्पर्धक व पालक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.




चार दिवसीय राज्यस्तरीय बुद्धिबळ चाचणी 



ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना क्रीडाक्षेत्रातील बुद्धिबळ या खेळाची माहिती व्हावी, या खेळाचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार होऊन जागृती व्हावी या हेतूने सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे व कृषी उत्पन्न बाजार समितीला विकासाच्या शिखरावर नेणारे लोकनेते स्व. वसंतराव धोत्रे यांच्या जयंती निमित्त 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गायवाडा सभागृहात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे . 






राज्यस्तरीय स्पर्धा ही सोळा वर्षा आतील मुलामुलींची आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा असून ही स्पर्धा साखळी पद्धतीने घेण्यात येत आहे. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला रोज दोन सामने खेळायचे असून एकूण आठ सामने खेळावे लागत आहेत.  स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला नव्वद मिनिटांचा वेळ देण्यात येत असून तीस सेकंदाचा वाढीव वेळ देण्यात येतो . स्पर्धेत  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील चार मुले व चार मुली सहभागी झाले आहे. स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था राधाकिसन प्लॉट येथील माहेश्वरी भवन येथे केली आहे.





या स्पर्धेमधून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा दिल्ली येथील स्पर्धेसाठी चार मुले खुला गट व चार मुलींची महाराष्ट्र संघासाठी निवड होणार आहे.  स्पर्धेमध्ये दोन्ही गटातील प्रथम दहा खेळाडूंना रोख बक्षिसे व प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकच्या खेळाडूंना रोख बक्षिसे सोबत ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच आठ व दहा वर्षाच्या आतील प्रथम तीन खेळाडूंना पण ट्रॉफी देण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  





टिप्पण्या