surya namaskar-Akola-fitness: 75 करोड सूर्यनमस्कार मोहीमेस अकोल्यात आरंभ






ठळक मुद्दा


दि.1/1/2022 या दिवशी अजिंक्य फिटनेस पार्क येथे -75 करोड सूर्यनमस्कार उपक्रमाला सुरवात झाली.

       



ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: राष्ट्रीय स्तरावर विविध संस्थान द्वारा 1 जानेवारी पासून 20 फरवरी पर्यंत कुठलेही 21 दिवस सूर्यनमस्कार उपक्रम मध्ये सहभाग घेण्याकरता अजिंक्य फिटनेस पार्क येथे आतापर्यंत 139 सहभाग नोंदविला आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींचा पण सहभाग नोंदला गेला आहे.



नववर्ष प्रारंभी या कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी श्री संजय  पांडे (जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय, वाशिम) हे उपस्थित होते. पार्कमधील उपस्थित सर्व सभासदांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, आरोग्यदायी वातावरणात covid-19 च्या नियमांचे  पालन करत सूर्यनमस्कार घातले. श्री धनंजय भगत यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार  प्रकार करवून घेतले. 



 

या वेळी महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला तर पार्क मधील प्रशांत, अविनाश वसतकर, आशिष नेताम, राजेश्वरी जांबे माया भुईभार व शारदा डोंगरे यांनी सहभाग घेऊन इतर काम सांभाळले.




      

"रथसप्तमी सूर्यनमस्कार दिनी मागील दोन वर्षापासून 24 तासाची अखंड सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन होत असते, याकरता पण नाव नोंदणी व सराव सुरू आहे."

-धनंजय भगत

अकोला






टिप्पण्या