Shivlila patil-kirtan-Akola city: सकारात्मक बाबीनेच सृजनतेची निर्मिती- हभप शिवलीलाताई पाटील यांचे मत




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: समाजात जोपर्यंत सकारात्मक व नैतिक व्यवस्थेची निर्मिती होणार नाही, तोपर्यंत स्वस्थ समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. या व्यवस्थेत देवत्व या विषयी नकारात्मकता मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. देव ही दिसण्याची अथवा बघण्याची बाब नसून ती अनुभवाची बाब आहे. म्हणून स्वस्थ व सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी सामाजिक नैक्तीकता निर्माण व्हावी, अशी अभिलाष राज्यस्तरीय महिला कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांनी आपल्या कीर्तनात केली.



स्थानीय देशमुख पेठ येथील आई तुलजाभवानी मित्र मंडळ व छत्रपती फिटनेस सेंटरच्या वतीने रविवारी स्थानीय छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आयोजित कीर्तन सोहळ्यात राज्यस्तरीय ख्यातिप्राप्त महिला कीर्तनकार हभप शिवलिलाताई पाटील कीर्तन करीत होत्या. 




आ. रणधीर सावरकर,आ. अमोल मिटकरी, माजी महापौर विजय अग्रवाल आदींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कीर्तन सोहळयात हभप शिवलीलाताई यांनी मानवी जीवनातील व्यथा आपल्या कीर्तनात व्यक्त केल्यात. त्यांनी यावेळी युवापिढीने कसे वागावे याची अनेक उदाहरणे सादर केलीत.




जनाबाईचे दळण भगवंत कसे दळत हे सांगितले. मंदिरात आपण देवाकडे काही मागायला जातो. मात्र मंदिरात देवाकडे मागायला न जाता आपल्याला देवाने जे काही जाता आपल्याला देवाने जे काही आपल्याला देवाने जे काही दिले त्याचे आभार व्यक्त करायला मंदिरात जा असा हितोपदेश दिला. 



यावेळी त्यांनी तुकोबारायांची अभंगवाणी आपल्या कीर्तनात सादर करीत सृजनतेवर भर दिला. महिला, मुलींनी कसे वागावे, युवापिढीने समाजात कसे राहावे याचे सुंदर विवेचन त्यांनी यावेळी सादर करीत भगवान कृष्णाची ही सादर करीत भगवान कृष्णाची ही विहंगम गाथा सादर केली.



कार्यक्रमाचा प्रारंभ छ्त्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व मान्यवरांच्या स्वागताने झाला. सर्वप्रथम जय गजानन माऊली भजन मंडळ देशमुख पेठच्या महिला मंडळाने उत्कृष्ट भजने सादर केलीत. प्रास्तविक मंडल अध्यक्ष पवन महल्ले यांनी करून उपक्रमाची माहिती दिली. संचालन सौरभ वाघोडे यांनी तर आभार अमोल सातपुते यांनी मानले.




कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचे नियोजन करून उपस्थितांना मास्क व सॅनिटायझरचें वितरण करण्यात आले. 



यावेळी ऍड.सुधाकराव खुमकर,पंकज जायले,ऍड निंबाळकर,डॉ.जयस्वाल, सतीश आहाळे, शंकरलाल शर्मा,सुरेश पाली,संतोष मोहता,बाळूभाऊ माहुलकर, जयंतलाल पटेल,भरत भडांगे, प्रदीप लुगडे, रमेश जैन, विजय यादव,बंडू हातेकर, विठ्ठल कावडे, रुपेश रुईकर, अनिल यादव, नंदू तायडे, सतीश बाथो, विशाल घुगे, मनीष पटेल समवेत बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.



सफलतेसाठी संदीप बाथो,सागर तिवारी, राहुल लोहिया, ऋषी जगताप, गणेश माने, रोशन कसाब, सोनू चव्हाण, महेश मोडक, आदित्य सोनोने, अमन मंडुले,वैभव मोरे, सौरभ मांडूले, दत्त मुराई, देव मुरारी,अमित मानकर, यश दांडेकर , आदित्य रामटेके, ऋषी आकृतीकर, आर्यन बैराग आदींनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या