sahitya sammelan-tukdoji maharaj: राष्ट्रसंतांचे साहित्य समाजाची वेदना मांडणारे - भाऊसाहेब थुटे; राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ८ वे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला :  राष्ट्रसंतांचे साहित्य समाजाची वेदना मंडणार आहे. राष्ट्र, समाज बलवान करण्यासाठीं सर्वांनी संघटित येऊन मानवता वादी विचार पेरणे काळाची गरज आहे. हा विचार अशा साहित्य संमेलनातून तळागाळापर्यंत पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष जेष्ठ गुरुदेव प्रचारक भाऊसाहेब थुटे यांनी शनिवारी केले.





राष्ट्रसंतांच्या विचारांचे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. 






यावेळी संमेलनाध्यक्ष भाऊसाहेब थुटे यांनी आपल्या बीज भाषणात राष्ट्रसंतांच्या राष्ट्रीय कार्यावर प्रकाश टाकला.  आज तरुणांनी संत साहित्याचा अभ्यास करून समाजातील उणीवा सुरू करण्यासाठी , समाज सेवेसाठी पूढे यावं. सर्वांचा धर्म मानवता आहे . भारतीय संस्कृती,संत, साहित्य तेच शिकवते आणि राष्ट्र संतांनी सुध्दा आपल्या समग्र सहित्यात ग्रामगीता ,युग प्रभात , भजनानमधे तोच मानवता वादी विचार मांडला आहे. असा विचार त्यांनी मांडला.



 


वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित आठवे राज्यस्तरीय विचार साहित्य  समेलनाचे उद्घाटन माजी सैनिक स्व. शंकरराव राऊत यांच्या पत्नी शेवंताबाई राऊत यांच्या हस्ते पार पडले. प्रास्ताविकातून सेवा समिती चे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट साहित्य संमेलन प्रत्येक जिल्हयात व्हावे.आणि राष्ट्रधर्म जागृतीसाठी तरुणाई ने पूढे यावे. असे प्रतिपादन  केले.




विचारपीठावर स्वागताध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज, डॉ.सचिन म्हैसने, धनजय मिश्रा, महादेवराव भूईभार, प्रा. चोरे,कपिल ढोके, ॲड.दिलीप कोहळे, माधवराव सूर्यवंशी, प्रा.दिलीप काळे, मनोहरराव रेचे, डॉ रत्नपारखी, सुधाताई जवजाळ , डॉ.ममता इंगोले, रविदादा मानव, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.




यावेळी कोरोना काळात उलेखनिय कार्य करणाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने  शंकरराव कु. सुरभी दोडके, कु. वैष्णवी टिकार , ॲड भोरे, डॉ सचिन म्हैसने, पराग गवई, योगेश लबडे, कु वैष्णवी आसेकर , सौ शालिनीताई देशमुख, सन्मानित करण्यात आले.




यावेळी ॲड संतोष भोरे, ज्ञानेश्र्वर साकरकर, डॉ राजीव बोरकर, सचिन माहोकार, राजेंद्र झामरे, मयुर वानखडे, बबलू तायडे, डॉ रामेश्वर लोथे, श्रीकृष्ण ठोंबरे, गोपाल गाडगे,अतुल डोंगरे, सागर म्हसाळ, श्रीपाद खेळकर, प्रा. विनोद वेरूळकर, आकाश हरणे, संजय इंगळे, देविदास नेमाडे, प्रसाद बरगट ,प्रमोद शेंडे, मिनल इंगळे, कु. तेजस्विनी फलाणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा पखाले, प्रा. मनीष देशमुख,  तर आभार प्रा.मोनिका शिरसाट यांनी मानले.




जीवन गौरव पुरस्कार प्रदान



आयुष्यभर राष्ट्रसंतांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या गुरुदेव सेवकांचा भजनसम्राट स्व. रामभाऊजी गाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिवन गौरव पुरस्कार देऊन सनमनीत करण्यात येत असते. यावर्षी श्री बाबारावजी गेडाम, श्रीमती कमलाबाई किरडे यांना ग्रामगिता जिवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

टिप्पण्या