national shooting ball federation Cup: राष्ट्रीय शुटिंगबॉल फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद; अकोल्यातील 5 खेळाडूंचा विजयात वाटा

In the National Shootingball Federation Cup Maharashtra team wins the title




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: बिहारमधील गया येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय शुटींगबॉल फेडरेशन चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने मध्य प्रदेशचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. मध्य प्रदेश उपविजेते, तर राजस्थानला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


भारतीय शुटींगबॉल फेडरेशन, बिहार स्टेट शुटींगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गया, बिहार येथे राष्ट्रीय नेमबाजी बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सीआयएसएफ आणि बिहार संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर महाराष्ट्र संघाचा उपांत्य फेरीचा सामना राजस्थानशी झाला. या सामन्यातही महाराष्ट्राने राजस्थानचा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यात झाला. या सामन्यात मध्य प्रदेशच्या संघाने महाराष्ट्राला जोरदार झुंज दिली, मात्र महाराष्ट्राकडून मिळालेल्या फटक्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 



एसबीएफआयचे सचिव रवींद्र तोमर, हौशी शूटिंगबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव विष्णू निकम, खजिनदार शकीलोद्दीन काझी, अतुल निकम आदींनी खेळाडूंचा सत्कार करून प्रोत्साहन दिले व शुभेच्छा दिल्या.


असा आहे विजयी महाराष्ट्र संघ


राष्ट्रीय शुटिंगबॉल फेडरेशन चषक स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्र संघात मोहम्मद शोएब, शेख मोहम्मद साबीर, जुबेर शहा, रोशन पवार, ओम पवार, वैभव राजे, बापूराव मेंडकर, सागर नवग्रे, अकोल्याचे गजानन झाडे, मो साकीब, गोविंदा निखाडे, भावेश निखाडे, खलोकर यांचा समावेश होता.

टिप्पण्या