Journalists-Day-2022-Akola city: कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसतांनाही समाजासाठी जीव ओवाळून टाकणारे पत्रकार सत्काराचे पात्र - सेवानंद वानखडे

Journalist's Day 2022: Journalists deserve to be honored for sacrificing their lives for the society without any security - Sevanand Wankhade




ठळक मुद्दा

परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य व रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिन साजरा




ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: निर्ढावलेले समाजकंटक असले तरीही त्यांच्या विरोधात जाऊन पत्रकार बातम्या प्रकाशित करत असतात. तसेच कोविड सारखी महामारीची भीती न बाळगता पत्रकार पत्रकारिता करीत असतात.  सध्याच्या पत्रकारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसतांनाही समाजासाठी  जीव ओवाळून टाकणारे  पत्रकार  सत्काराचे पात्र आहेत, असे मत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी व्यक्त केले.



परिवर्तन स्वाभिमानी संघटना व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ६ जानेवारी २०२२ रोजी तथागत पॅलेस वाशिम बायपास रोड अकोला येथे पत्रकार दिन किसनराव हुंडीवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'पत्रकार सन्मान सोहळा' कार्यक्रमात ते बोलत होते. 



 

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे ,परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र व  रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष  सावळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 






या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण  हुंडीवाले (सदस्य गवळी समाज संघटना महाराष्ट्र ) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे,महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर ,समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडु  वानखडे ,परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र मार्गदर्शक अमोल जगताप, साई ड्रायव्हिंग स्कूलचे विजय वानखडे रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनु वानखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 




पत्रकारांचा सन्मान

 

कार्यक्रमात पत्रकार मनीष खर्चे, संघपाल सिरसाठ, संजय चक्रनारायण, दीपक गवई,प्रा. प्रज्ञानंद  थोरात, म. रा. पत्रकार संघाचे  अमरावती विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ तायडे, नरेश टमटमकर, प्रा.वंदना शिंगणे, ॲड. नीलिमा शिंगणे (जगड ), शाहिद इकबाल, इरशाद अहमद, चांद रिजवी, सय्यद सज्जाद, निलेश तायडे, सुरेश राठोड, इमरान अहमद, निलेश तायडे, संदेश वानखडे, प्रमोद पांडे, साक्षी गवई, समीर खान, जोशी आदी पत्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन पत्रकार दिन साजरा करण्यात आला. 




या कार्यक्रमाचे संचालन साक्षी गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष सावळे यांनी केले.


                   सन्मानचिन्ह

टिप्पण्या