- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
heavy rain-Akola-weather-alert: हवामान विभागाचा इशाराःअवकाळी पावसाची शक्यता; यंत्रणांनी सज्ज राहावे, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला,दि.७: भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार येत्या ११ तारखेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभुमिवर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाला सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. वीजांच्या कडकडाटा पासून तसेच गारपीट झाल्यास स्वतःचा व आपल्या पशुधनाचा बचाव करावा, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. तसेच या पार्श्वभुमिवर सर्व यंत्रणांनी सज्ज राहून दक्षता घ्यावी असे निर्देशही दिले आहेत.
दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला होता. या अवकाळीमुळे प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
राज्यात ६ ते १० जानेवारी २०२२ दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे; असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल; असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भाच्या काही भागांना ९ जानेवारी २०२२ रोजी गारपिटीचा फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांकरिता ८ जानेवारीसाठी यलो अलर्ट आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा