election 2022-vidarbha majha: विदर्भाचा सर्वागिण विकास हेच विदर्भ माझा पार्टीचे मुख्य ध्येय-मंगेश तेलंग





ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: विदर्भ राज्याचा विकास हे वेगळे विदर्भ राज्य स्थापन करून करण्याच्या हेतूने विदर्भ माझा पार्टीची स्थापना मा. राजकुमार तिरपुडे यांनी केली. विदर्भ व्हिजन आणि विदर्भाचा सर्वागिण विकास हेच विदर्भ माझा पार्टीचे मुख्य ध्येय आहे. विदर्भ राज्यामध्ये असलेल्या महानगर पालिका, नगरपालिका, पंचायत समित्या व जिल्हा परिषदा यांचा सर्वतोपरी विकास होण्याच्या दृष्टिनेच विदर्भ माझा पार्टीने होऊ घातलेल्या अकोला महानगरपालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याचे प्रदेश महासचिव मंगेश तेलंग यांनी सांगितले. 


हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेलंग यांनी आगामी महापालिका निवडणूक मध्ये पक्षाची भूमिका,ध्येय धोरण आदी बाबीवर पत्रकारांशी संवाद साधला.



युवक आणि महिलांना प्राधान्य



अकोला महानगरपालिकेत सत्तेवर असलेला प्रस्थापित पक्ष जनतेची समस्या सोडविण्यास संपूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. या भावनेतून व जनतेला पूर्ण सुविधा देण्याच्या उद्देशाने विदर्भ माझा पार्टी संपूर्ण प्रभागात उमेदवार उभे करणार असून युवक आणि महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचे ठरले असल्याचे देखील तेलंग म्हणाले.विदर्भ माझा पार्टी महिलांना 50 टक्के उमेदवारी देणार असल्याचे देखील यावेळी तेलंग यांनी घोषीत केले.




अभिवचन


अकोला महानगरपालिकेने लावलेल्या अवास्तव कर ज्यामध्ये कोणतीही सुविधा जनतेला मिळत नसल्या कारणामुळे अशा कराचा मुदंड अकोलेकर भोगत आहेत. हे संपूर्ण कर विदर्भ माझा पार्टी सत्तेत आल्यास माफ करेल. तसेच शहरात असलेली घाण कचऱ्याचे नियोजन करण्याचा पुर्णतः बंदोबस्त करेल, शहरात असलेला फेरीवाल्यांचा गहण प्रश्न सुध्दा निर्माण झाला आहे. या फेरीवाल्यांना स्थायी स्वरुपाच्या जागा देणे शहराच्या सौंदर्यीकरणात मोलाचा वाटा निर्माण करेल, महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करून घेतांना जनतेला होत असलेली प्रचंड ससेहोलपट व आर्थिक पिळवणूक थांबवून भ्रष्टाचाराचा आळा घालण्याचा कसोशीने प्रयत्न करेल, डंपींग ग्राऊंड खुल्या मैदानावर सुशोभीकरण इत्यादी भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माझा पार्टी पुर्णत: वचनबध्द राहील, अकोला शहराला अनियमित होत असलेला पाणी पुरवला नियमित करून दोन दिवसा आड स्वच्छ पाणी देण्याचे अभिवचन विदर्भ माझा पार्टी देत असल्याचे तेलंग यांनी ठामपणे सांगितले.




प्रदेश महासचिव मंगेश तेलंग यांच्या सह जिल्हा अध्यक्ष अजाबराव ताले, जिल्हा महासचिव राहुल जाधव पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

टिप्पण्या