Akola crime-civil lines-akl city: रणपिसे नगरात चौकीदारावर प्राणघातक हल्ला; आरोपीस अटक,आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

                    प्रतिकात्मक/संग्रहित चित्र




अकोला : सिव्हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीतील  जागृती विद्यालय जवळ असलेल्या मुरलीधर टॉवर्स या अपार्टमेंट मधील रहिवासी असलेल्या एका मद्यपी युवकाने तेथीलच चौकीदारावर कुदळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी महेंद्र पवार याला सिव्हिल लाईन्स पोलिसांनी घटनास्थळी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

        



घटनेची हकीकत अशी की, रणपिसे नगर मधील जागृती विद्यालय जवळ असलेल्या मुरलीधर टॉवर्स या अपार्टमेंट मध्ये काम करणारे चौकीदारावर येथीलच रहिवाशी असलेल्या युवकाने क्षुल्लक कारणावरून कुदळीने प्राणघातक हल्ला चढविला. 

या घटनेत चौकीदार गंभीर जखमी झाले असून हरिदास शेंडे असे त्यांचे नाव आहे. 

 


घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळावरून पळ काढत असलेल्या महेंद्र पवार नामक आरोपीस  घटनेत वापरलेल्या कुदळीसह पोलीस कर्मचारी रवी यादव यांनी पकडले. यानंतर महेंद्र पवार वर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.



घटनास्थळी शहर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा भेट दिली. या घटनेत जखमी झालेल्या चौकीदाराला सुरुवातीला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु चौकीदाराला सर्वोपचार रुग्णालयात कोणी भरती केले आता ही बाब सुद्धा संशोधनाची बनली आहे. तर यावेळी चौकीदाराचे पडलेले रक्त पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पाणी टाकून धुण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त आहे. त्यामुळे आता या घटनेत आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.


याप्रकरणी गजानन शेंडे यांच्या फिर्यादी वरून सिव्हिल लाईन पोलिसांनी भा दं वि कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टिप्पण्या