VBA- Bachchu Kadu-FIR-road: पालकमंत्री कडू यांच्या विरोधात पोलिसात तक्रार; अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर बच्चू कडू यांनी निधी वळता केला- वंचित बहुजन आघाडीचा आरोप; सिटी कोतवालीत वंचितचा ठिय्या







नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे सादर केलेले रस्ते कामांच्या या प्रस्तावात फेरबदल करून पालक मंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश कडू उर्फ बच्चू कडू यांनी पदाचा दुरुपयोग करून अस्तित्वात नसलेल्या रस्ते कामांसाठी निधी वळता केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे  प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्य वर्धन पुंडकर यांनी केला आहे. बच्चू कडू यांनी बनावट दस्तऐवज बनवून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार पुंडकर यांनी  यांनी अकोला येथे सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे नोंदविली आहे. 



याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग कामांसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत नियतव्यय मंजूर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने अकरा कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजूर करून गेल्या 10 मार्च 2021 रोजी जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला होता. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन आणि नियमांचे पालन करून जिल्हा परिषदेमार्फत विकासकामांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यामध्ये पालकमंत्री  कडू यांनी फेरबदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्ते कामांसाठी निधी वळता केला. ज्या रस्ते बांधकामाचा प्रस्ताव नाही ठराव नाही. शासन दरबारी नोंद नाही, अशा रस्ते कामांसाठी निधी वळता करण्यात आला. पालकमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग करून अस्तित्वात नसलेल्या रस्ते काम बांधकाम रस्ते कामांसाठी निधी वळता करून तसेच बनावट दस्तऐवज तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केला. याबाबतची तक्रार धैर्यवर्धन पुंडकर यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. 




यामध्ये गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पूल व पोच मार्गासाठी पन्नास लाख रुपये ही इजिमाला जोडणाऱ्या धामणा ते नवीन धामणा गाव जोड रस्ता सुधारणा करण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. संबंधित दोन्ही रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक नसताना निधी वळता करण्यात आला. तसेच ग्रामीण मार्ग असलेला कुटासा ते पिंपळोद हा रस्ता इतर जिल्हा मार्गामध्ये दाखवून या रस्त्यावर कुटासा गावाजवळ लहान पूल व रस्ता कामासाठी 1 कोटी 25 लाख रुपयाचा निधी वळता करण्यात आला, असा आरोप तक्रारीत पुंडकर यांनी केला आहे. 



पालकमंत्री कडू यांनी राजीनामा द्यावा




पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे मागणी वंचित बहुजन आघाडीचे दर्या वरदान कुंडकर युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी केला आहे.



ठाणेदार म्हणाले... ही तर झुंडशाही!




अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांनी पदाचा गैरवापर करून जिल्हा नियोजन समितीचे निधीचा अपहार आणि भ्रष्टाचार केल्या प्रकरणात शुक्रवारी रात्री वंचित बहूजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावेळी ठाणेदार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती व वंचितचे पदाधिकारी यांना उद्देशून झुंडशाही करून दबाव आणता का, असा अपशब्द वापरले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.



ठिय्या आंदोलन


वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे. यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला पालकमंत्री विरुद्ध एफ.आय. आर. दाखल करून गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी वंचितच्या पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात ठीय्या मांडला. या उपरही पोलिसांनी कारवाई केली नाही तर सनदशीर मार्गाने न्यायालयात दाद मागण्यात येईल,असे पुंडकर यांनी सांगितले.




ठिय्या मागे


तक्रार अर्जाची सत्यता पडताळून गुन्हे दाखल करण्यात येणार. याबाबतचे पत्र सिटी कोतवाली ठाण्याचे ठाणेदार यांनी आंदोलकांना दिले. यानंतर VBA च्या पदाधिकारी यांनी आंदोलन मागे घेतले. सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन रात्री 10.30 च्या सुमारास मागे घेण्यात आले.




ठिय्या आंदोलनात डाॅ धैर्यवर्धन पुंडकर (प्रदेश उपाध्यक्ष) वंचित बहुजन आघाडी, राजेंद्र पातोडे (प्रदेश महासचिव) वंचित बहुजन युवा आघाडी,अरुंधतीताई शिरसाट (प्रदेश महासचिव वंचित बहुजन महीला आघाडी), प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष,प्रभाताई शिरसाट (महीला आघाडी जिल्हाध्यक्ष), प्रतिभाताई भोजने (जि प अध्यक्ष अकोला),सावित्री राठोड (जि प उपाध्यक्ष), आकाश शिरसाट (जि प सभापती), पुष्पाताई इंगळे, सचिन शिराळे, हिरासिंग राठोड, विकास सदांशिव, श्रीकृष्ण देवकुणबी, हरिष रामचवरे, शरद इंगोले, सागर खाडे आदीनी सहभाग घेतला.

टिप्पण्या