Shivaji College Akot: Parliament: अभिरूप युवा संसद स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अकोट संघाला चौथा क्रमांक





अमरावती: श्री.शिवाजी शिक्षण संस्था आणि युवक बिरादरी (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अभिरूप युवा संसद स्पर्धे करिता श्री. शिवाजी महाविद्यालय अकोट, मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे 20 स्वयंसेवकांनी  महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.सुनील पांडे आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. स्नेहल रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला येथे प्रशिक्षणानंतर विद्यापीठ स्तरीय निवड करण्यात आली. 



अभिरूप युवा संसद विभागीय स्पर्धा श्री.शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे 13 डिसेंबर रोजी झाली. या स्पर्धेत 6 महाविद्यालयाच्या संघाचा समावेश होता. 




या ठिकाणी श्री.शिवाजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख , तसेच  संस्थेचे सचिव शेषराव खडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 



या स्पर्धेत श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट विभागीय स्तरावर चौथा क्रमांक पटकावला. पारितोषिक म्हणून रोख पाच हजार रुपये प्राप्त झाले. तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी अक्षय वानखेडे याची राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद साठी मुंबई करीता निवड झाली. 



या स्पर्धेसाठी सत्ताधारी पक्ष भुमीका- गृहमंत्री संकेत तेलगोटे, नैसर्गिक वायु व पोलाद मंत्री तेजस्विनी लोणकर, कृषि व कामगार व रोजगार मंत्री वैशाली धांडे, शिक्षण व युवा कौशल्य मंत्री यश चाफे,  रस्ते व वाहतूक मंत्री वैभव भालतिलक, राज्यमंत्री- सोनम चौधरी, प्राची रेखाते, व साक्षी थोरात.


विरोधी पक्ष भुमीका- रितिका चौरागडे, समीक्षा तेलगोटे, अजय तेलगोटे,  पवन बन्सोड, अक्षय वानखडे, निखिल वानखडे, स्वप्निल ओंईंबे, चंचल नाथे, मयुरी काळे, सभापति-गार्गी लहासे, समीक्षा पालेकर यांनी निभावली. 




यावेळी विद्यार्थी व रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी गजानन तायडे व सहायक अधिकारी प्रा. स्नेहल रोडगे, प्रा.भारत नागरे यांनी विशेष परिश्रम घेतले.


टिप्पण्या