- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला दि.३१: ओमायक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन यांच्या दि. ३० डिसेंबर रोजीच्या सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. यासुचना संपुर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता आज (दि.३१ डिसेंबर) पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. `
सुधारीत नियमावलीः
१.
लग्नसोहळा व लग्नसंमारंभाच्या बाबतीत , बंदिस्त जागा, हॉल, मेजवानी/मॅरेज हॉल इ. तसेच खुल्या जागेकरिता उपस्थितांची मर्यादा ५० पेक्षा जास्त ठेवता येणार नाही.
२.
इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी ५० पेक्षा जास्त ठेवता येणार नाही.
३.
अत्यंविधी करिता २० व्यक्ती मर्यादीत राहतील.
४.
जिल्ह्याच्या कोणत्याही भागात जी पर्यटन स्थळे आहेत किंवा इतर ठिकाणे आहेत जी मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीला आकर्षित करतात अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्थळी तसेच वाहतूकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर (Social Distancing) च्या नियमांचे पालन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती त्यांचेमध्ये कमीत कमी सहा फुटाचे सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी पाच पेक्षा जास्त जास्त लोक एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत आवश्यक तपासणी करुन स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, पोलीस विभागांनी दंडात्मक कारवाई करावी.
५.
शासकीय कार्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नागरीकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा केल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. नसल्यास, RT PCR चाचणीचा अहवाल सोबत ठेवावा.
६.
सर्व सावर्जनिक ठिकाणी वावरतांना तसेच शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरीकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
७.
कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तसेच कोविड अनुरुप वर्तनाचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी सक्षम प्राधिका-याला संबंधीत आस्थापना यांनी तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यकराहील. निर्बंधाचे उल्लंघन करणा-यावर तसेच संबंधीत आस्थापनेवर दंडनीय कारवाई संबंधीत प्राधिकारी यांचेकडून करण्यात येईल.
८.
कोविड संदर्भाने दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेशातील निर्बंध कायम राहतील.
९.
कोविड नियमांचे उलंघन करणाऱ्या व्यक्तींवर/आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे दंड आकरणाची आदेश यापुढेही कायम राहतील. या बाबत काटेकारपणे तपासणी व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्ती प्राधिकारी, आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला , महसूल विभाग तसेच ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालीका/नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची राहील.
असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा