Omicron- Akola district-Sec144: ओमिक्रॉनची धास्ती; अकोला जिल्ह्यात जमावबंदी आदेश

Omicron threat in Akola district Section 144 applied from midnight today





अकोला,दि.४:  कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या दरम्यान ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्याने संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निमा अरोरा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्य्हात जमावबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.


या आदेशान्वये  जिल्ह्यात रविवार ५ डिसेंबर मध्यरात्री १२ वा. पासून शहरी व ग्रामिण भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.  या काळात कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा इ. आयोजन करता येणार नाही.  या कालावधीत कोविड लसीकरणाचे काम नियमित सुरु राहिल. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या