Mahatma Gandhi-kalicharan maharaj: कालीचरण महाराजला दोन दिवसांची पोलीस कोठडी

                                     file photo


अकोला: छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजला रायपूर पोलिसांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून पहाटे अटक केली होती. सायंकाळी उशिरा त्याला रायपूरच्या टिकरापारा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर पोलीस लाईन येथे मेडिकल झाल्यानंतर त्याला रायपूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.




यादरम्यान कालीचरण समर्थक मोठ्या संख्येने न्यायालयाच्या आवारात पोहोचले होते, आणि त्यांच्या अटकेविरोधात घोषणाबाजी केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.  मात्र समर्थक जागचे हलले नाही. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  


एस एस. पी. प्रशांत अग्रवाल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, मध्य प्रदेशातील खजुराहोपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर धामजवळ पहाटे 4 वाजता कालीचरणला अटक करण्यात आली. कालीचरण हा खासगी लॉजमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होता. 

रायपूर पोलिस सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्यासोबत टिकरापारा पोलिस ठाण्यात पोहोचले.यानंतर उशिरा सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने कालीचरण महाराजला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.




 .

टिप्पण्या