Mahatma Gandhi-kalicharan maharaj: 'कालीचरण' सारख्या प्रवृत्तीशी काँग्रेसचा लढा सुरूच राहील-अशोक अमानकर




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला दि,30: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरूध्द रायपूर येथे आयोजीत धर्मसंसदेमध्ये अकोल्याच्या काली नावाच्या माथेफीरूने अपशब्द उच्चारले. यामुळे संपुर्ण देशातील अहिंसावादी, स्वातंत्रवादी व सत्यग्रही लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. काली नावाचा हा मनुष्य स्वतःला धर्माचा पंडीत व महाराज म्हणवुन घेतो, परंतु त्यास धर्माची व येथील संस्कृतीची कोणतीही जाण नाही याची प्रचीती त्याच्या धर्मसंसदेतील भाषणामधुन जाणवते. याने फक्त महात्मा गांधी विरूध्द अपशब्दच नाही वापरले तर तमाम अहिंसक लोकांना याच पध्दतीने संपवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले व तेथील जमलेल्या जमावाला त्या पध्दतीने शपथ सुध्दा दिली. गांधीचा खुन करणारा नथ्थुरामाचे गोडवे गायल्याशिवाय त्यांचे भाषण पुर्णच होवु शकत नाही व ते सुध्दा त्याने रायपूर येथील धर्मसंसदेमध्ये केले.कालीचरण सारख्या देशद्रोही प्रवृत्तीच्या विरुद्ध भारतीय काँग्रेस पक्ष सदैव लोकशाही मार्गाने व महात्मा गांधीजींच्या तत्व विचारने सदैव लढा देत राहील,असे मत अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी व्यक्त केले.


कॉंग्रेस कार्यकर्त्यांना साडेचार तास पोलीस स्टेशन समोर तक्रारीसाठी बसवून ठेवलेल्या अधिकारी विरुद्ध तक्रार करणार असून, गांधीजीं बद्दल अपशब्द  बोलणाऱ्याच्या विरोधात तक्रार घेण्यासाठी या देशात एवढा उशीर होतो;ही देखील एक शोकांतिकाच आहे, अशी खंत अमानकर यांनी व्यक्त केली.




विवादग्रस्त कालीचरण महाराज यांच्या अंतरिम जामीन व आगामी आंदोलन संदर्भात स्वराज्य भवन येथे आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद बोलविण्यात आली होती.यावेळी अमानकार बोलत होते. अशोक अमानकार यांच्या सह राजेश भारती, ऍड. महेश गणगणे जिल्हा कार्याध्यक्ष, डॉ.प्रशांत वानखडे महानगर अध्यक्ष आदींची प्रमुख उपस्थिती होती.




अमानकर पुढे म्हणाले की, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण व शहर) ने या सर्व घटनांचा विस्तृतपणे अभ्यास करून अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देवुन येथील पोलीस प्रशासनास त्याच्या विरुद्ध गुन्हयाची नोंद करण्यास भाग पाडले. गुन्हयाची नोंद होताच स्वतःला महाराज म्हणवणारा हा माथेफिरू काली अचानक गायब झाला व न्याय व्यवस्थेपासुन पळु लागला. या देशातील न्याय व्यवस्था आजही सामान्य माणसाचा आवाज ऐकुन त्याच्या चेतनेवर आघात झाल्यास त्याच्या बाजुने समर्थपणे उभी राहते हेच कालच्या विद्यमान न्यायालयाच्या निकालावरून लक्षात येते. या कालीने संपूर्ण देशात कोठेही जमानतीचा अर्ज दाखल केला नाही पण त्याने त्याकरीता फक्त अकोला शहराची निवड केली. अकोल्यातील तमाम काँग्रेसवासी व गांधीप्रेमी लोकांनी ही न्यायालयीन लढाई अत्यंत सक्षमपणे लढली व न्यायालया समोर आपली बाजु भक्कमपणे मांडली. या सर्व बाबींवर न्यायालयाने विचार करून त्याची जमानत अर्ज खारीज केला,लढाईची ही पहिली पायरी यशस्वी झाली असे अमानकार म्हणाले.


येथील धर्मांध शक्तींना कालीचे जोरदार स्वागत करायचे होते व त्याकरीता त्यांनी यथायोग्य तयारी केली होती परंतु येथील न्यायव्यवस्थेने त्यावर पाणी फेरले. कालीवर यापुर्वी सुध्दा अनेक गुन्हे दाखल आहेत व त्याची समाजामध्ये गुंड म्हणुन प्रतिमा आहे. अकोल्यातील जुने शहर भागात हा अनेकवर्षा पासुन राहतो व त्याने शिक्षण मध्येच सोडुन दिले आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना न्यायालयीन पध्दतीने जेरबंद केले तरच भविष्यातील तरुणांची माथे फिरविण्याचे काम करण्यास त्यांना मज्जाव घालता येईल. कालीस मध्यप्रदेश मधील खजुराहो येथे अटक करण्यात आली. महाराष्ट्रातील इतर भागात सुध्दा त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अमानकार यांनी दिली.


कॉग्रेस जनांकडुन कालीवर एफआयआर दाखल करण्यात आला व त्या गुन्हयांमध्ये वाढ करण्याकरीता विशेष विनंतीअर्ज जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे देण्यात आलेला आहे. या न्यायालयीन लढाईत कॉंग्रेस कडुन  ऍड. नजीब शेख यांनी अत्यंत प्रभावीपणे व ऐतीहासिक दाखले देवुन न्यायालयासमोर बाजु मांडली असल्याचे अमाणकार यांनी सांगितले.




भविष्यातील न्यायालयीन लढाई तसेच रस्त्यावरची लढाई सुध्दा या देशाचे भविष्य सुरक्षीत ठेवण्याकरीता काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते चालु ठेवतील, असा निर्धार या निमीत्ताने व्यक्त करतो. या लढाईमध्ये कोठेही कोणत्याही प्रकारची ढिलाई न देता ही लढाई चालुच ठेवु. पुढील टप्यामध्ये याकरीता आंदोलन करण्याचे जरी काम पडले तरी काँग्रेसचा प्रत्येक शिपाई आपल्या घरावर तुळसीपत्र ठेवुन महात्मा गांधींच्या सत्याची लढाई आग्रहपूर्वक लढेल,असा निर्धार अमानकार यांनी व्यक्त केला.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा