legislative council election 2021: अकोल्यात शिवसेनाला धक्का; भाजपचे वसंत खंडेलवाल भरघोस मतांनी विजयी


Legislative Council Election 2021: Vasant Khandelwal win

 


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : अकोला - बुलढाणा - वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक - 2021 विधानपरिषद करिता आज अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सरकारी धान्य गोदामात मतमोजणी प्रक्रियेला सकाळी आठ वाजता पासून सुरुवात झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून वसंत खंडेलवाल यांना 443 प्राप्त झाली  तर गोपिकीसन बाजोरिया यांना 334 मते मिळाली. तर 31 मते अवैध ठरली. 109 मतानी खन्देलवाल विजयी ठरले. हा विजय ऐतिहासिक विजय ठरला.


महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) हे चौथ्यांदा निवडणुकीत रिंगणात उभे होते. तर भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढली आणि भरघोस मतांनी विजयी झाले. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानल्या गेली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांची मते निर्णायक ठरली. 




या निवडणुकीत 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.  वसंत खंडेलवाल विजय घोषीत होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.

टिप्पण्या