Keliveli-kabaddi-tournament2022: ठरलं तर जानेवारीत पुन्हा रंगणार केळीवेळीची कबड्डी स्पर्धा…




ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: सामनावीर व आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू विनायक माळी यांचे नावाने जानेवारीत २१,२२,२३ रोजी कबड्डी खेळाची पंढरी केळीवेळी येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.  



हनुमान मंडळ केळीवेळीचे दीपस्तंभ, मार्गदर्शक गुरुवर्य माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी यांच्या अकोला स्थित रामनगर येथील निवासस्थानी स्पर्धा आयोजन बाबत मंगळवार 21 डिसेंबर रोजी सभा झाली. या सभेत स्पर्धा तारखेवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कोरोना मुळे या स्पर्धा रखडल्या गेल्या होत्या. 


सभेत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. या बैठकीला दाळू गुरुजी, मंडळाचे अध्यक्ष माधवराव बकाल, ग्राम मंडळाचे अध्यक्ष गुरुदेव किशोर बुले, कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेव नेरकर, मंडळाचे पंचप्राण डॉ राजकुमार बुले, दिलीप आसरे, गणेश पोटे, संजय चौधरी, अनिल गासे, संतोष शिवरकर,विनायक माळी, अमोल चिलात्रे, ओमप्रकाश दाळू, कमलेश गावंडे, संजय बदरखे, श्रीकृष्ण आढे, प्रमोद सुरे, सुरज बुले, अरुण अमृतकार, अतुल जवंजाळ व धनंजय मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या