Journalism Award Ceremony: अकोला जिल्हा पत्रकार संघ बैठक: येत्या 29 जानेवारीला पत्रकारीता पुरस्कार वितरण सोहळा; 6 जानेवारीचा पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार

Akola District Press Association: Journalism Award Ceremony on 29th January; Journalist Day on January 6 will be celebrated across the district





ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : मराठी पत्रकार परिषद संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष व जिल्हा कार्यकारी मंडळाची बैठक गुरुवार 23 डिसेंबर रोजी स्व. पन्नालाल शर्मा सभागृह, पत्रकार भवन अकोला येथे पार पडली. स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीत आयोजित 6 जानेवारीचा पत्रकार दिन सोहळा जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर आयोजित करण्याचे या बैठकीत ठरले. 



पत्रकारीता पुरस्कार वितरण सोहळा


अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देण्यात येतात. हा पत्रकारीता पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा येत्या 29 जानेवारी 2022 रोजी घेण्याचे ठरले. हा भव्य दिव्य सोहळा  गौरक्षण - कौलखेड रिंग रोडवरील हॉटेल राजे लॉन्सवर घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. 



विविध ठराव पारीत



बैठकीत विविध ठराव पारीत करण्यात आले.शासनाने पत्रकारांंचा सहभाग असलेल्या अधिस्विकृती समिती व तंटामुक्ती समिती तात्काळ गठीत कराव्यात असे ठराव पारित करण्यात आले. 



व्यासपीठावर विराजमान



बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा होते. व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, उपाध्यक्ष गजानन सोमाणी, रामदास वानखडे विराजमान होते. 




कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित



बैठकीला कार्यकारी मंडळाचे सदस्य व पदाधिकारी सर्वश्री अविनाश राउत, राजु उखळकर, संगिता इंगळे, शेख कुदरूस, प्रदिप काळपांडे, निलेश जवकार, जयेश जगड, विजय शिंदे, हरिओम व्यास, उमेश देशमुख, कमलकिशोर शर्मा, समाधान खरात, दीपक देशपांडे, मंगेश लोणकर, रविंद्र इंगळे, कमलकिशोर भगत, नंदू सोपले, मोहन जोशी, मुकुंद देशमुख, शरद गांधी, अ‍ॅड. निलीमा शिंगणे-जगड, प्रा. वंदना शिंगणे, रामदास काळे, शाहाबाज देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन प्रमोद लाजुरकर यांनी केले. 



दिवंगत अग्रवाल व हागे यांना भावपूर्ण श्रध्दांजली


सभेच्या प्रारंभी अकोला जिल्ह्यातील अलिकडे दिवंगत झालेले पत्रकार स्व. लक्ष्मण हागे व पत्रकार स्व. बालमुकुंद अग्रवाल यांना सभेत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पण्या