heavy rain: अकोल्यात गारपीट: अतिवृष्टीमुळे तूर हरबरा पिकांचे नुकसान; शहरात नाल्याचे पाणी रस्त्यावर…

ठळक मुद्दा

नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे -आमदार सावरकर


Hailstorm in Akola: Damage to tur gram crop due to heavy rains;  Nala water on the road in the city ...






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जिल्ह्यात मंगळवारी अचानक अतिवृष्टी व गारपीट झाल्याने भाजीपाला तुर, हरबरा पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी परत संकटात सापडला आहे. 




पिक विमा कंपनी, महसूल विभाग कृषी विभागाने संयुक्तरीत्या सर्वे करून नैसर्गिक आपत्ती सापडलेल्या शेतकऱ्याला आधार द्यावा. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महा विकास आघाडी सत्तेत आल्यापासून नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या पाठीशी येत असून, त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्यांची बिघडत चालली आहे. विकास कामे ठप्प आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. अठरापगड जाती व बारा बलुतेदारांसाठी विशेष पॅकेज देण्याची गरज आहे,अशी मागणी आज  जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित  पवार यांच्याकडे केली आहे.


सध्या शेतकरी अडचणीत असून ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. शेतकऱ्यांचे आत्महत्या चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे या दृष्टीने शासनाने त्वरित सर्वे करू शेतकऱ्यांना मदत द्यावी नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी विनंती आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.





गारांच्या पावसाचा आनंद

दरम्यान,अकोला शहरात काही भागात गारांचा पाऊस पडल्याने बच्चे कंपनीने याचा आनंद लुटला. 



रस्त्यावर गटारगंगा 



थोडा सुद्धा पाऊस झाला तर अकोला शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था नव्याने उघड पडते. आज दुपारी झालेल्या पावसामुळे नाल्यां तुडुंब भरल्या गेल्याने घाण पाणी रस्त्याने वाहू लागले. डाबकी रोड मार्गासह अन्य मार्गाची हीच अवस्था झाली. 




या जिल्ह्यात पाऊस


राज्यातील औरंगाबाद,जालना, नागपूर, अमरावती,अकोला, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज 28 डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली होती.  हवामान  विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील मराठवाडा आणि विदर्भ आज 28 डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार आहे,अशी माहिती ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट द्वारा दिली होती. तर नागपूर हवामान विभागाने देखील पावसाचा इशारा दिला होता.


दरम्यान आज झालेल्या अतिवृष्टी मुळे राज्यात तूर हरबरा,ऊस,गहू,कांदा, बोर, संत्रा पीक खराब झाले. 





टिप्पण्या