gaushala-mahasangh- vidarbha: गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्य विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी ॲड. मोतीसिंह मोहता यांची नियुक्ती




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : गोशाळा महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री महेन्द्रभाई संगोई, मुंबई यांचे उपस्थितीत विदर्भातील 11 जिल्ह्यातील गोशाळा संचालकांची सभा गोकुलम् गोरक्षण संस्था, अमरावती येथे रविवार 19 डिसेंम्बर रोजी पार पडली. या सभेमध्ये अकोला येथील सुप्रसिद्ध अधिवक्ता ॲड. मोतीसिंह मोहता यांची महाराष्ट्र गोसेवा संघाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली.



सभेमध्ये विदर्भातील जवळपास 150 गोशाळांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री गिरीषभाई शहा, मुंबई, समस्त महाजन, श्री विजयभाई वोरा, मुंबई, श्री जयेशभाई शहा, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. मुरके, विनय बोथरा, डॉ. सुनिल सुर्यवंशी, श्री विजय शर्मा, अमरावती हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. 



सभेत गोशाळेंच्या अडी-अडचणींबाबत चर्चा झाली. या सभेमध्ये अकोला येथील सुप्रसिद्ध अधिवक्ता ॲड. मोतीसिंह मोहता यांची महाराष्ट्र गोसेवा संघाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच श्री विजय शर्मा, अमरावती यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.





आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प, अकोलाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ऍड. मोहता यांनी यशस्वीरित्या 11 वर्षे धुरा सांभाळली. तसेच ऍड. मोहता हे बार कॉन्सील महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष व वर्तमान सदस्य आहेत. पश्चिम विदर्भातील प्रख्यात दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोलाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकिय व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले ऍड. मोतीसिंह मोहता हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. तसेच भाटे क्लब, अकोला व अकोला जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, अकोलाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. राजस्थानी सेवा संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचा अनेक धार्मिक व सामाजित संस्थांशी जवळचा संबंध आहे. गोरक्षण कार्यामध्ये त्यांनी स्वत:ला झोकुन कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे विदर्भातील गोशाळांना लाभ होईल.




या सभेसाठी अकोला येथून विवेक बिडवई, रमाकांत खोपडे, ऍड. धिरज शुक्ला, रवि चांडक, सुरेश खंडेलवाल, राजेश जैन, अरुण बजाज हे प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या