- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Fake secretary:education:Akola: पंचशील संस्थेचे बनावट सचिव व तथाकथित प्राचार्य धैर्यवर्धन पुंडकर यांच्या कारभाराची चौकशी व्हावी- रामराव उंबरकरसह संस्थापक सदस्यांची मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पत्रकार परिषदेत पुंडकर यांच्या गैरकारभाराचा वाचला पाढा
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: बाळापुर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संचालित करणाऱ्या पंचशील टीचर्स एज्युकेशन सोसायटी अकोला या संस्थेचे बनावट सचिव म्हणून शैक्षणिक संस्थेचा कारभार बघून महाविद्यालयात अनियमितता व भ्रष्टाचार करण्याच्या तथाकथित प्राचार्य धैर्यवर्धन पुंडकर यांच्या कारकिर्दीची चौकशी करून नवीन कार्यकारिणी गठित करण्यात यावी अन्यथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर जाहीर आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थेच्या रेकॉर्डवर असणाऱ्या संस्थाचे संस्थापक सदस्य रामराव उंबरकर, रामभाऊ अहिर आणि त्र्यंबकदादा शिरसाट यांनी केला आहे.
सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रा धैर्यवर्धन पुंडकर यांच्या गैरकारभाराचा पाढाचं संस्थापक सदस्य रामराव उंबरकर यांनी वाचला.
बाळापुर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कार्यरत असून या संस्थेचा 1984 ते 1987 या कलावधीमधील चेंज रिपोर्ट वगळता अद्यापपर्यंत एकही चेंज रिपोर्ट मंजूर करण्यात आला नाही या बाबीचा लाभ प्रा. पुंडकर यांनी घेवून अल्पमतात असताना ही संस्थेच्या कोणत्याही विश्वस्त वा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीर व एकतर्फी कारभार करून महाविद्यालयात अनियमितता व भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप यावेळी उंबरकर यांनी केला.
प्रा. धैर्यवर्धन हरिभाऊ पुंडकर हे या संस्थेचे साधे सदस्य तथा सचिव नसतानाही बनावट सचिव म्हणून खोटे ठराव घेऊन विद्यापीठ व सहसंचालक अमरावती यांची दिशाभूल करून त्यांनी खोटे व बनावट ठराव घेऊन विद्यापीठाची देखील दिशाभूल केली. इतकेच नव्हे तर प्रा. पुंडकर यांनी स्वतः च्या आई-वडिलांचे नाव महाविद्यालयाला देण्याचा बनावट प्रस्ताव सादर केला. संस्थेत बहुमत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी अमरावती विद्यापीठ व धर्मादाय आयुक्त यांना तक्रारी केल्यात. मात्र अद्याप यावर कारवाई झाली नाही. मात्र धर्मादाय आयुक्त अकोला यांचेकडे पिटीआरची मागणी केली असता, विद्यापीठाच्या ही बाब लक्षात आली की, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी विद्यापीठाची फसवणूक केली. संस्थेचे सदस्य तथा सचिव नसताना महाविद्यालयाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव सादर करून पुंडकर यांनी विद्यापीठ व शासनाची फसवणूक करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याचे पत्र सुद्धा विद्यापीठाने संस्थेस दिले असल्याचे उंबरकर यांनी पुरावासह सांगितले.
प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या तोतयगिरीची, फसवणुकीची, भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत सस्थेच्या संस्थापक सदस्यांनी केली. मागण्या त्वरित मंजूर न झाल्यास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे सर्व संस्थपक सदस्य आमदार उपोषणास बसणार आहेत.या उपरही कारवाई न झाल्यास प्रा.धैर्यवर्धन पुंडकर व त्यांना या कामात सहकार्य करणाऱ्यांवर फोजदारी खटले दाखल करण्यात येईल,अशी चेतावणी पत्रकार परिषदेत उंबरकर यांच्या सह अहिरे व शिरसाट यांनी दिली.
प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी स्वतःच्या वडिलांचे व आईचे नाव कॉलेजला देण्याबाबतचा व त्यावर संस्था सचिव म्हणून प्राध्यापक धैर्यवर्धन पुंडकर यांनी खोटा व बनावट ठराव घेऊन बनावट सदस्य तयार करून त्यावर नीरज बजाज यांना अनुमोदक म्हणून बनावट नाव टाकले व हा ठराव कुलगुरू यांच्याकडे नावात बदल करण्यासाठी पाठविण्यात आला. प्राध्यापक धैर्यवर्धन हरिभाऊ पुंडकर संस्था सचिव प्रकाश शेळके निरज बजाज हे संस्थेचे बनावट सदस्य व पदाधिकारी दाखवून प्राध्यापक धैर्यवर्धन पुंडकर यांनी संस्थेची व प्रशासनाची फसवणूक केली आहे. प्राध्यापक धैर्यवर्धन पुंडकर यांनी संस्थेच्या लेटरपॅडवर सचिव म्हणून लिहिले आहे. प्राध्यापक हरिभाऊ शंकरराव पुंडकर स्वतःच्या मुलाला संस्था सचिव दाखविले तसेच विद्यापीठाकडे ठराव पाठवून स्वतःच्या मुलाचे प्रभारी प्राचार्य पदाचे नियुक्तीचे आदेश करून व खोटा ठराव घेऊन प्रशासनाची फसवणूक केली आहेत. प्राध्यापक धैर्यवर्धन हरिभाऊ पुंडकर हे 12 ऑक्टोबर 2020 ला प्रभारी प्राचार्य नसतानाही महाविद्यालयातील प्राध्यापक चव्हाण, प्राध्यापक बाठे, प्राध्यापक सी बी बदनखे, प्राध्यापक आल्हाद भावसार, प्राध्यापक सुनील उमाळे व स्वतः प्राध्यापक धैर्यवर्धन हरिभाऊ फुंडकर यांनी स्वतःच्या सह्यांचा सचिव म्हणून पदनिश्चिती करून घेतली असून ही बाब गंभीर आहे. पुंडकर यांनी प्रशासनाची व विद्यापीठाची फसवणूक करून मोठा गुन्हा केला असल्याचा गंभीर आरोप संस्थापक सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला.
अमरावती विद्यापीठ
Balapur
Dhairya Vardhan Pundkar
education
Fake secretary
Panchsheel Sanstha
Ramrao Umbarkar
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा