AMC Election 2022:WPA:Akola: अकोला मनपा निवडणुकीत आणखी एका नव्या पक्षाची उडी: प्रहार,वंचित अश्या समविचारी पक्षा सोबत युतीसाठी तयार- कासिम रसूल इलियास




ठळक मुद्दा

वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया अकोला मनपा निवडणूक मूल्यांवर लढणार



 

ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया दहा वर्षांपासून मूल्यांवर आधारित राजकारण करून, संपूर्ण भारतात पक्ष मजबूत करण्याचे काम करत आहे. भारतातील 12 राज्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आणि वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया आपले काम स्वच्छ भावनेने करत आहे. येत्या अकोला  महापालिका निवडणूक पक्ष लढणार असून, प्रसंगी अन्य समविचारी पक्षासोबत युतीसाठी तयार आहोत.यासाठी प्रहार जनशक्ती आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांसोबत बोलणीचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कासिम रसूल इलियास (दिल्ली) यांनी सांगितले.


कासीम इलियास हे शनिवारी अकोल्यात आले असता,त्यांनी मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.



WPA  पर्याय


डॉ. कासीम रसूल इलियास पुढे म्हणाले की, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया हा एक नोंदणीकृत पक्ष आहे; जो राजकारणात एक पर्याय म्हणून उदयास आला आहे. राजकारणात साम, दाम, दंड,भेद असतो पण आमचा पक्षाने परिवर्तनाचा पर्याय निवडला आहे. नांदुरा नगरपालिकेत 1 फैजपूर नगरपालिकेत 2 अशा प्रकारे आम्हाला निवडून देऊन 3 नगर परिषद सदस्य आले आहेत.



स्वच्छ प्रतिमा असलेल्या पक्षांशी युती


अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही युतीसाठी समान पक्ष आणि मूल्यांच्या आधारे बाजूने बोलणी सुरू आहेत. आम्ही स्वच्छ प्रतिमा असलेल्या पक्षांशी युती करून पुढे जाऊ. अकोला महानगरपालिकेत शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी, स्वच्छ वस्ती, लोकांच्या मूलभूत सुविधा आदी मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवू,असे देखील डॉ कासीम यांनी सांगितले. 



शेकडो कामगारांना न्याय


अकोला शहरात 10 वर्षात आम्ही शेकडो कामगारांना वेल्फेअर लेबर युनियनच्या माध्यमातून मदत केली आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळाले असून, अनेक सामाजिक कार्यात काम केले आहे. अन्याय विरोधात आवाज उठवला आहे. अकोल्यात अनेक भागात विकास कामेही केली. यापुढे सुद्धा मूल्यांच्या आधारावर राजकारणात सक्रिय होऊन सामान्य जनतेला न्याय मिळवून देवू,अशी ग्वाही डॉ कासीम यांनी दिली.



अकोला शहरांचा सर्वांगीण विकास


अकोला शहराचा सर्वांगीण विकास आणि सामान्य नागरिकांना मूलभूत गरजा मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे,असे ठामपणे डॉ कासीम यांनी सांगितले.



सर्वधर्मीय सोबत



WPI पक्ष धर्माच्या नावाखाली राजकारण न करता सर्वधर्मीयांना सोबत घेवून राजकरणात उतरला आहे.सर्वधर्मीय लोक पक्षात आहे.11 राज्यांमध्ये पक्ष बळकट झाला आहे.महाराष्ट्रातही पक्षाने मुंबई सह अन्य जिह्यात आपला पाया रोवला आहे.अकोला शहरात येत्या निवडणुकीत 15 उमेदवार पक्ष देणार आहेत, जे पक्षात सक्रिय आहेत अश्यानाच पक्ष उमेदवारी देणार असल्याचेही डॉ कासीम यांनी सांगितले.




हे होते उपस्थित


पत्रकार परिषदेला राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ऍड.  कासिम रसूल इलियास दिल्ली यांच्यासह मुजतबा फारूक औरंगाबाद, महमूद उस्मान अकोला जिल्हाध्यक्ष, शहजाद अन्वर राज्य सदस्य, अजहर चौधरी अकोला शहर अध्यक्ष, जहीर कॉन्ट्रॅक्टर मजदूर संघ अध्यक्ष, कलीम खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या