Akola crime: सात मोटारसायकली व एक सायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार मुद्देमालसह पोलिसांच्या जाळ्यात






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: मोटार सायकली चोरी करणारा अटटल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाचे जाळ्यात सापडला असून, अकोला जिल्हयातील चोरीच्या एकुण सात मोटारसायकली व एक सायकल सह मोटारसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अटक केलेल्या गुन्हेगारकडून पोलिसांनी एकुण किंमत ०५,६०,०००-/ रू. चा मुददेमाल जप्त केला आहे.




याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोला शहर व जिल्हा परिसरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याने  पोलीस अधिक्षक जी. श्रीधर  व अपर पोलीस अधिक्षिका  मोनिका राउत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक  संतोष महल्ले व स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील अधिकारी व कर्मचारी यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. 




दरम्यान शनिवार ११ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पथकास मिळालेल्या गुप्त बातमीवरून रुपेश रामलाल शाहु (वय ३० वर्षे रा. शिवसेना वसाहत जुनेशहर अकोला जि. अकोला)  ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथे आणुन विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने आतापर्यंत एकुण ०७ मोटार सायकल हया अकोला शहरातुन चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर आरोपीकडुन एकुण ०७ मोटार सायकली किंमत अंदाजे ०५,६०,०००/- रु. जप्त करण्यात आल्या. 



हे गुन्हे उघडकिस 


१) पो.स्टे. सिव्हील लाईन अपराध कमांक ८६७/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. 


२) अपराध क्रमांक ९१७ / २०२१ कलम ३७९ भा.दं.वि. 


३) पो.स्टे. खदान अपराध क्रमांक ८२१/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. 


४) अपराध क्रमांक ११३०/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. 


५) पो.स्टे. रामदासपेट अपराध कमांक ९७४/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि.  


६) पो.स्टे. सिटी कोतवाली अपराध क्रमांक २७/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. 


७) पो.स्टे. सिव्हील लाईन हद्दीतील चोरीची एक बजाज पल्सर मोटरसायकल. तसेच एक सनकॉस सायकल अशा एकुण सात मोटार सायकली व एक सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.




ही कामगिरी ही पोलीस अधिक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक मोनिका राउत, पोलीस निरिक्षक संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. महेश गावंडे व सहकारी प्रमोद डोईफोडे, नितिन ठाकरे न शंकर डाबेराव, मनोज नागमते, मो. अमिर रोशन पटले, गणेश सोनोने, सतिश गुप्ता, सुशिल खंडारे यांनी केली आहे.



टिप्पण्या