Akola court:Rashtriya lokadalat: अकोला जिल्हा न्यायलयात राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to National lok adalat in Akola District Court




अकोला, दि.11: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालये येथे आज (दि. 11) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. यामध्ये  जिल्हा न्यायलय येथे सिव्हील व क्रिमिनलचे 10 हजार 643  प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीस यनशिवराज खोब्रागडे यांनी दिली.




यावेळी एस.एस. स्वरुपकुमार बोस व जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालयात 11 पॅनलची व्यवस्था केली होती. या पॅनलच्या माध्यमातून सिव्हील व क्रिमिनल प्रकरणे निकाली काढण्यात आली. 



यामध्ये प्रामुख्याने  निगोशिएबल इन्सट्रुमेन्टस् ॲक्टच्या कलम -138 खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, विज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे (तडजोडीस अपात्र प्रकरणे वगळून), कोविड कालावधीत झालेले प्रकरणे व इतर (फौजदारी तडजोडपात्र, वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणे) व कोर्टात प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती.





याप्रसंगी पक्षकारांना लोक अदालतीच्या मार्फत विधी विषयक सल्ला व मार्गदर्शन मोफत दिल्या गेले. मोठ्या संख्येने लोक अदालतचा लाभ नागरिकांनी घेतला.

टिप्पण्या