100 crore case: अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांची ईडी कडून चौकशी

100 crore case: Inquiry of Akola District Superintendent of Police G Sridhar by ED (file photo)






अकोला: राज्यातील बहुचर्चित कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची चौकशी होणार असून, ते आज सकाळी मुंबईतील ED कार्यालयात हजर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 



माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंबंधी मनी लाँडरिंग प्रकरणात जी श्रीधर यांची चौकशी होणार असल्याचे कळते. 



सध्या परिस्थितीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कारागृहात आहेत. या संपूर्ण चौकशीत अकोला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांचे देखील नाव आता समोर आले आहे. ईडीच्या चौकशीनंतर या प्रकरणात जी श्रीधर यांचा किती सहभाग आहे. अथवा या प्रकरणात दोषी आहेत किंवा नाही, हे चौकशी अंती सिद्ध होणार आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर आणि सचिन वाझेशी असणारे संबंध उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांच्या भोवताली कारवाईचा बडगा फिरत आहे. 



अनिल देशमुख यांच्याशी निगडीत विविध मालमत्तांवर ईडीने याआधी छापे देखील टाकले. या कथित घोटाळ्या संदर्भात चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली. त्यानुसार सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. आता अकोल्याचे पोलीस अधीक्षक  यांचेही नाव समोर आले आहे  आज जी श्रीधर इडी समोर चौकशीसाठी हजर झाल्याने या प्रकरणात आणखी कोणाचे नाव उघड होणार आहे ?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.





टिप्पण्या