ST worker strike:private vehicles: एस टी कर्मचाऱ्यांच्या संप कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

Private vehicles are allowed to carry passengers during the strike period of ST employees





ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: एस टी कर्मचाऱ्यांच्या संप कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासन (गृह विभाग परिवहन) द्वारे सर्व खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मोटार वाहन अधिनियम अन्वये विशेष अधिकाराचा वापर करून मान्यता दिली आहे. या बाबतची अधिसूचना शासनाने सोमवारी काढली आहे.


अशी आहे अधिसूचना



ज्याअर्थी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांकरिता बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले आहे.


ज्याअर्थी नागरिकांची गैरसोय होऊ नये वास्तव, प्रस्तावित संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे. असे शासनास वाटते.


त्याअर्थी, आता मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ चा ५९) चे कलम ६६ चे उपकलम ३ चा खंड (एन) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सर्व खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


दिनांक ८ नोव्हेंबर, २०२१ च्या मध्यरात्रीपासून प्रस्तावित संप/आंदोलन ज्यावेळी मागे घेतले जाईल त्यावेळी सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी.



महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ही अधिसूचना गृह विभाग (परिवहन) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन मिनाक्षी कऱ्हाडे यांनी जारी केली आहे.

टिप्पण्या