negligence-Election-Commission निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणा मुळे हजारो मतदाता मतदान पासून वंचित राहणार - मदन भरगड

Thousands of voters will be deprived of voting due to negligence of Election Commission - Madan Bhargad



ठळक मुद्दा


मतदानाची टक्केवारी कमी होण्या मागे मतदारांचे निरुत्साह हाच एकमेव कारण नसून  मतदार यादीतील त्रुटि सुध्दा एक मोठे कारण आहे.




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : पूर्व-पश्चिम विधानसभेच्या मतदार यादी मधे अनेक त्रुटि असल्यामुळे त्याचा परिणाम येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणूकी वर होऊन मतदान कमी होणार आहे तरी निवडणूक विभागाने   त्रुटि लवकर दूर कराव्या, अशी मागणी प्रदेश कांग्रेसचे सचिव व माजी महापौर मदन भरगड यांनी केली आहे.




भरगड यांनी आज या संदर्भात पत्रकार परिषद बोलाविली होती.यावेळी त्यांनी मतदार यादीत असलेले घोळ पुरावानिशी सादर केले.अवघ्या महाराष्ट्रात ही परिस्थिती असल्याचेही ते बोलले.



   

सरकार व निवडणुक विभाग प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी खुप प्रयत्न करतात. करोडो रुपयाची जाहिरात देऊन जनजागृति करतात. तरी पण  मतदानाची टक्केवारी वाढत नाही. आज पर्यंतचा रेकॉर्ड पाहुन असे दिसते, मतदानाची टक्केवारी कमी होण्या मागे मतदारांचे निरुत्साह हाच एकमेव कारण नसून  मतदार यादीतील त्रुटि सुध्दा एक मोठे कारण आहे. या त्रुटि दूर झाल्यावर निश्चित मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास भरगड यांनी व्यक्त केला.



अशा आहेत त्रुटी


दर वर्षी हजारो नागरिक नवीन घर बांधणे, भाडयाचे घर बदलणे अश्या अनेक कारणामुळे घर किंवा मोहल्ला बदलत राहतात. या नागरिकांच्या मतदार यादी मधील घरचे पत्ते बदलणे, मतदान केंद्र बदलण्या करिता निवडणूक आयोगा कडून  फॉर्म क्रमांक 8 अ ची व्यवस्था  केलेली आहे. मागील दीड वर्षापासून हे फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर प्रोसेस होत नसल्याने मतदारांना याचा त्रास होतो , म्हणून हजारो मतदातांच्या घर किंवा मोहल्ला बदलल्या नंतर ही जुनीच मतदार यादी मधे नाव कायम राहते. त्यांच्या राहत्या नवीन मोहल्याच्या मतदार यादी मधे त्यांचे नाव ट्रांसफर होत नसल्यामुळे असे हजारो नागरिक मतदाना पासून वंचित राहतात. तरी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोगाने फॉर्म 8 अ च्या ऑनलाईन प्रोसेसची समस्या लवकर दूर करावी. ही समस्या अकोला शहरापुरतीच मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्र राज्यात असल्याने, याकडे प्रामुख्याने मुख्य निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्या पासून वंचित राहणार नाही,असे भरगड यांनी सांगितले.



एकाच परिवारातले नावे वेगवेगळ्या मतदार यादीत नावे तर काहींची एकाच यादीत तीन-चार ठिकाणी नावे




भिंतिला भिंत लागून राहण्याऱ्या नागरिकांचे व एका परिवारांच्या सर्व सदस्याचे नाव एकमेकाच्या नावाच्या बाजूला असले पाहिजे. एकाच यादी भाग क्रमांकाच्या मतदार यादीत असले पाहिजे परन्तु हजारो नागरिकांचे व परिवारांच्या सदस्यांचे नाव घराला घर लागून असूनहि मतदार यादीत नाव मात्र दूर आहे. व काही मतदारांचे, परिवारांच्या सदस्याचे नाव तर दुसऱ्या मतदार यादी भाग क्रमांकात आहे  या सर्व घोळाची दुरुस्ती निवडणूक आयोगाने तात्काळ करावी,अशी मागणी भरगड यांनी केली. तर मतदार यादीची बारकाईने पाहणी केल्यास बहुतांश यादीत एकाच मतदाराचे एकाच यादीत एकाच पानावर तीन-चार ठिकाणी वेगवेगळ्या क्रमांकाने नावे दिसतात, असा हास्यास्पद प्रकार देखील मतदान यादीत पाहायला मिळतात,असे भरगड यांनी पुरावा सह पत्रकार परिषदेत सांगितले.


मतदार केंद्र परिसरातच असावे


शक्य तो मतदार ज्या परिसरातील मतदार राहतात तिथुन मतदार केंद्र जवळ असले पाहिजे. शहरातील अनेक भागात मतदान केंद्र हे मतदारच्या लांब असल्याने मतदानाच्या दिवशी मतदाराना त्यांच्या त्रास होतो. तसेच एकाच मतदाराचे नाव अनेक मतदार यादीत पाहायला मिळते. हि समस्या सुद्धा दूर करावी. उदाहरणार्थ गितानगर बायपास येथील राहणाऱ्या नागरिकांचे  मतदान केंद्र क्रमांक 232,233,234 हे हैदरपुरा खदान येथे आहे. असेच अनेक प्रकार मतदान केन्द्रा बद्दल शहरात इतर ठिकाणी ही पहायला मिळत असल्याचे भरगड यांनी सांगितले.




निवडणूक आयोगाने हाती घेतलेला डिजिटल ओलखपत्राचा कार्यक्रम पूर्णपणे राबविलेला नाही अद्याप ही अनेकांची डिजिटल ओळखपत्रे मतदाराना मिळालेली नसल्याचेही भरगड यांनी निदर्शनास आणून दिले.



महानगर पालिकेत नवीन समाविष्ट गावात जनजागृती करावी

 

निवडणुक आयोगाच्या नाव नोंदणी कार्यक्रम अंतर्गत खुप कमी बी एल ओ मतदान केन्द्रा वर हजर असतात. तसेच अकोला महानगर पालिकेत नवीन गावे जोडले गेल्याने त्यांची अपडेट डिजिटल मतदान ओळखपत्रे मिळालेली नाही . मतदारांना, मतदान ओळखपत्र कुठे बनवावे ही साधी माहिती नसल्याने शिवणी , भौरद, खडकी, मोठी उमरी जे नवीन भाग अकोला महानगरपालिकेत जोडल्या गेले आहेत, अश्या प्रभागातील मतदारांची डिजिटल मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी धळपळ सुरु आहे. पण नेमके ओळखपत्र बनवण्यासाठी कुठे जावे हे नागरिकांना प्रशासनाने जनजागृती पूर्णपणे केली नसल्याने, मतदान ओळखपत्र बनवण्यास मतदारांची पंचाईत होत आहे.

 

   


या सर्व त्रुटि मतदार यादीत असल्यामुळे मतदाता पर्यंत त्यांच्या वोटर स्लिप पोहचत नाही. अश्या  नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती नसल्यामुळे असे हजारों नागरिक मतदान पासून वंचित राहतात.या त्रुटि दूर करण्याची मागणी मदन भरगड यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे  केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

टिप्पण्या