Lunareclipse-Maharashtra:Akola महाराष्ट्रात चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम नाही: धार्मिक विधींची गरज नाही; 19 नोव्हेंबरला कार्तिक, त्रिपुरारी पौर्णिमा होणार साजरी



Lunar eclipse in Maharashtra has no effect: no need for religious rites;  Kartik Tripurari Pournima will be celebrated (file photo)




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : येत्या चंद्रग्रहण संदर्भात अकोला पुजारी संघटनेची बैठक स्थानिक खोलेश्वर येथील भोलेश्वर मंदिरात घेण्यात आली.  नियान सागर, लोकविजय, सम्राट, काशी विश्वनाथ ऋषिकेश आदींच्या पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, १९ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे.  भारताच्या सुदूर ईशान्य भागातील अरुणाचल प्रदेश, आसाम भागात, हे चंद्रग्रहण मोक्षाच्या थोड्याच वेळात ग्रहणाच्या शेवटच्या स्थितीत दिसेल.  या कारणास्तव, संपूर्ण भारतात ग्रहणाच्या धार्मिक पद्धतीचे पालन करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात चंद्रग्रहणासाठी सुतक धार्मिक पद्धतीची अजिबात गरज भासणार नसल्याचे पुजारी संघाने स्पष्ट केले आहे. 




यामुळे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव देव दिवाळी साजरी करता येणार आहे. याच दिवशी गुरुनानक जयंती उत्सव, हरी-हर मिलन उत्सव होणार आहे तर या दिवशी तुळशी विवाह तिथी समाप्ती असल्याने घरोघरी तुळशी विवाह धूम धडाक्यात साजरा करता येणार आहे.



अरुणाचल प्रदेशात दिसणार चंद्रग्रहण



सम्राटाच्या पंचांगनुसार हे चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशातील तेजू गावात 4 मिनिटे, पासीघाट, शिमोग, 2 मिनिट लिख पाणी, या भागात सुतक पाळता येईल.  भारतात दुपारी 12:48 ते 4:17 या वेळेत चंद्रग्रहण होईल.  चंद्रग्रहण उपछायेचा प्रवेश सकाळी 11:30 वाजता होईल, चंद्रग्रहण उपछायेचा शेवट संध्याकाळी 5:36 वाजता होईल. महाराष्ट्रात धार्मिक विधानाची  गरज नसल्याने  कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा देव दीपावली साजरी केली जाऊ शकते.



विदेशात स्पष्ट दिसणार चंद्रग्रहण


हे चंद्रग्रहण पश्चिम आफ्रिका, पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया ऑस्ट्रेलिया, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, युनायटेड किंगडम इंडोनेशिया थायलंड चीन रशिया इत्यादी देशांमध्ये दिसणार आहे. मात्र जन्म राशीत प्रचलित चंद्रग्रहण योगाचे उपाय करता येतील, असे पुजारी संघाने सूचविले आहे.




बैठकीत  उपस्थित

बैठकीत सर्व श्री पंडित विमल व्यास, रमेशचंद्र आदिचवाल, श्यामसुंदर अवस्थी, प्रमोद तिवारी, राजू सिरोलिया, आलोक शर्मा आणि पंडित रवि कुमार शर्मा उपस्थित होते.



प्रमुख मंदिरांमध्ये दीपोत्सव

मोठे राममंदिर अकोला:(file photo)




संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र शताब्दीपूर्व मोठ्या राम मंदिरात कार्तिक पौर्णिमा निमित्त 19 नोव्हेंबर शुक्रवार रोजी देव दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. रांगोळी कलाकार प्रवीण पवार यांच्या कलाकृतीचे दर्शन अकोलेकरांना घडण्याच्या दृष्टीने, गेल्या 117 वर्षांची परंपरा अविरतपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामहरीहर संस्थेच्या विश्वस्त सुमन अग्रवाल यांनी दिली.




गेल्या तीस वर्षापासून वेगवेगळ्या परंपरा श्रीराम मंदिराच्या वतीने आरंभ करण्यात आली आहे. सर्व भक्तांच्या सहकार्याने देव दिवाळीला व्यापक रूप श्रीराम हरिहर संस्था व श्री रामनवमी शोभायात्रा समिती श्री रामदेव बाबा सेवा समितीने दिले आहे. आज या परंपरेनुसार अकोला शहरातील  मंदिरात देव दिवाळी साजरी करण्यात येत आहे. चेतना जागृती करून मोठ्या राम मंदिर संस्थेने राजेश्वर मंदिर व राम मंदिरात होणारी देव दिवाळी आज शहरातील सर्व प्रमुख मंदिरात साजरी करण्याची परंपरा सुरू केली आहे. 



शुक्रवार तसेच सूर्य उदय तिथी लक्षात घेता पौर्णिमेचे गंगास्नानचे महत्व गुरुनानक जयंती तसेच चंद्रग्रहण दिवसा असल्यामुळे दीपक दानाचे व प्रभू नाम स्मरणाचे महत्त्व लक्षात घेऊन व भक्तांना सर्व मंदीरातील दीपोत्सवाचे आनंद घेता यावे, यासाठी 18 व 19 नोव्हेंबरला दिव्य दिवाळी उत्सव साजरा करण्याचा निर्णय मोठ्या राम मंदिर विश्वस्त मंडळाने घेतला आहे. श्रीराम नगर मित्र मंडळ, रामनवमी शोभायात्रा समिती, श्री रामदेव बाबा  सेवा समिती, तसेच श्रीराम हरीहर संस्थानने ही परंपरा अखंड सुरू ठेवली आहे.कार सेवाच्या माध्यमातून हजारो दीपदान उत्सव साजरा करणाऱ्या  सर्व भक्तांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने सुमन अग्रवाल, विजय अग्रवाल, विनायक शांडिल्य गुरुजी, कल्याण शहा आदींनी  केली आहे.



जुने शहरातील प्राचीन श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे हरिहर मिलन उत्सव साजरा होत आहे. सलासार बालाजी मंदिर,राजेश्वर मंदिर आदी सर्व मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

टिप्पण्या