Leopards-Kaulkhed-forest:Akola: कौलखेड परिसरात बिबट्या:नागरिकांमध्ये दहशत; वनविभागाची सर्च मोहिम सुरू




Leopards in Kaulkhed area: panic among citizens;  Forest department launches search operation





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : कौलखेड परीसरातील नदी पात्रजवळ असलेल्या फार्मसी कॉलेजच्या मागच्या भागातील घनदाट अरण्यात आज मंगळवारी पहाटे काही नागरिकांना वन्य प्राणी बिबट्याचे दर्शन झाले. ही वार्ता परिसरात पसरल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



दरम्यान, बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच फार्मसी कॉलेजचे संचालक युवराज गावंडे यांनी वन विभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी पथकासह ऑन स्पॉट दाखल झाले असून, सर्च मोहीम सुरू केली. 




ड्रोन कॅमेराद्वारे सर्च ऑपरेशन सुरू असून, हे सर्च ऑपरेशन डीएफओ अर्जुन तसेच आरएफओ ओवे यांच्या मार्गदर्शनात  वनविभाग पथक करीत आहे. 




स्थानिक नागरिकांनी बिबट्या पुन्हा आढळेपर्यंत तरी किमान तीन दिवस पहाटे व रात्री अंधारात बाहेर फिरू नये, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक यांनी केले आहे.

टिप्पण्या