Legislative Council Election:BJP: वसंत खंडेलवाल यांच्या विरुद्धच्या दोन्ही याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळल्या




   रणधुमाळी:नीलिमा शिंगणे-जगड


Legislative Council Election: Both the petitions against Vasant Khandelwal were also rejected by the High Court






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीवर घेतलेल्या आक्षेपावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मत नोंदवित, खंडेलवाल यांच्या विरुध्द दाखल केलेल्या दोन्ही याचिका खारीज केल्या आहेत. खंडेलवाल यांच्या उमेदवारीला अकोल्यातील कॉंग्रेस  पराग कांबळे आणि रमेश बजाज यांनी आक्षेप नोंदवित न्यायालयात याचिका दाखल केली होती.



अकोला येथे आक्षेप फेटाळले


याबाबत सविस्तर वृत्त असे की, 23/11/21 रोजी अकोला, बुलढाणा आणि वाशीम मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपाचे वसंत मदनलाल खंडेलवाल यांनी नामांकन अर्ज सादर केला. 24/11/2021 रोजी सदर नामनिर्देशन अर्जाची छाणनी करण्यात आली. छाणनी दरम्यान, या मतदारसंघातील मतदारांपैकी एक असलेले नगरसेवक पराग मधुकर कांबळे यांनी  वसंत खंडेलवाल यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाच्या मान्यतेवर आक्षेप नोंदवला. त्याचप्रमाणे रमेश सत्यनारायण बजाज यांनी देखील आक्षेप नोंदविला होता. (जे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत.) दोन्ही आक्षेप रिटर्निंग ऑफिसर यांनी अकोला येथे फेटाळले. मात्र, रिटर्निंग अधिकारी यांनी दिलेल्या आक्षेपांना नकार देण्यास अनुक्रमे पराग मधुकर कांबळे आणि रमेश सत्यनारायण बजाज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिले गेले.  



काय म्हंटल आहे न्यायालयाने


याचिका क्र. 4827/2021 आणि रिट याचिका (मुद्रांक) क्र. 15471/21 असलेल्या दोन्ही याचिका उच्च न्यायालयाने (न्यायमूर्ती एस बी शुक्रे जे.आणि ए. एल. पानसरे जे.) आज 29/11/21 रोजी फेटाळल्या. यात उच्च न्यायालयाने असे स्पष्टपणे निदर्शनास आणले की, लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदी आणि संबंधित नियम लक्षात घेता, पराग कांबळे यांच्याकडे आक्षेप नोंदवण्याची जागा नाही आणि त्यांनी दाखल केलेली रिट याचिका कायम ठेवण्यायोग्य नाही.  त्याचप्रमाणे, रमेश सत्यनारायण बजाज यांनी दाखल केलेली याचिका योग्यताहीन आहे, कारण रिटर्निंग ऑफिसरने नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे किंवा आक्षेप घेणार्‍याने दाखल केलेला आक्षेप नाकारणे याला उच्च न्यायालयाच्या रिट अधिकारक्षेत्रात आव्हान दिले जाऊ शकत नाही.निवडणूक प्रक्रियेत अडथळा बाधा आणण्यासारखे आहे.



यांनी मांडली बाजू


दोन्ही याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांतर्फे अधिवक्ता अरुण अग्रवाल यांनी न्यायालयात बाजू मांडली. वसंत खंडेलवाल यांच्या बाजूने ज्येष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. अधिवक्ता वेद देशपांडे उपस्थित होते, जे या याचिकेत प्रतिवादी क्रमांक 3 होते. निवडणूक आयोग आणि रिटर्निंग ऑफिसर यांची बाजू अधिवक्ता  केतकी जोशी (सरकारी वकील उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ) यांनी मांडली.




मतदार संघात चर्चा


लोकशाहीमध्ये मतदारांनी दिलेला कौल मान्य करण्याऐवजी व निवडणूक ही लोक तांत्रिक पद्धतीने व्हावी. असे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू आहे परंतु निवडणुकीच्या आधी आपला पराजय होणार काय, या भीतीने व मतदारांवर विश्वास नसल्यामुळे असा प्रकार केला का, अशी चर्चा मतदार संघात आता जोर धरत आहे.




खंडेलवाल यांची प्रतिक्रिया


भाजपा उमेदवार संस्कारातून घडल्यामुळे त्यांनी नियमाचे पालन करून जमाबंदीचे आदेशचे तंतोतंत पालन करून शक्तिप्रदर्शन न करता मोजक्या पदाधिकार्‍यांच्या सोबत नामांकनपत्र दाखल करून व विकासाचा आराखडा घेऊन मतदान सोबत संवाद  सुरू केले आहे. मतदारांचा विश्वास जिंकणारच, असा विश्वास या निकालानंतर भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या