- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Jai Jawan-Jai Kisan-statue disappears-Akola-Janata Bazaar: आधुनिकीकरणाच्या नावाखाली 'जनता बाजार' मधील 'जय जवान जय किसान' पुतळा गायब!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*शेतकऱ्यांना व जवानांना संपवण्याचे भाजपचे धोरण, संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया
*पुतळा जिथला तिथे परत ठेवण्यात यावा, नागरिकांची मागणी
*'जय जवान जय किसान' पुतळा लाखो अकोलेकरांची जिव्हाळ्याचा विषय
ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: शहराचे सौन्दर्यीकरण करण्याच्या दृष्टीने व देशाचा इतिहास पिढी दर पिढी जिवंत राहावा, या हेतूने तत्कालीन अकोला नगर परिषदेचे अध्यक्ष शहराचे शिल्पकार स्व.विनयकुमार पराशर यांच्या संकल्पनेतून जनता भाजी बाजार येथे 'जय जवान जय किसान' पुतळ्याची उभारणी केली होती.आज मात्र शहराचा आधुनिक विकासाच्या नावाखाली अकोलेकरांची भावनांशी खेळण्याचा प्रकार मनपा सत्ताधारी करीत आहेत. भाजी बाजार समोरील जय जवान जय किसान पुतळा उखडून ठेवल्यामुळे लाखो अकोलेकरांनी संताप व्यक्त केला आहे. पुतळा जागच्या जागी परत ठेवण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
अकोला शहराचे वैभव
दिमागात उभा असलेला 'जय जवान जय किसान' हा पुतळा आता याठिकाणी नाही
पूर्वजानी अकोला शहराचे वैभव वाढवण्याकरता शहरांमध्ये चौकाचौकात महत्वाच्या जागेवर सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने व आपल्या देशाचा इतिहास जीवत राहावा, यासाठी जनता भाजी बाजारच्या समोर मोकळ्या जागेमध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला 'जय जवान जय किसान' हा नारा सार्थकी लागावं म्हणून त्यावेळी अकोला नगरपालिकेने अकोला शहराचे शिल्पकार विनयकुमार पराशर यांच्या संकल्पनेतुन आणि मार्गदर्शनात जनता भाजीपाल्याच्या मोकळ्या जागेमध्ये 'जय जवान जय किसान'च्या पुतळ्याची उभारणी करून शहराच्या सौंदरीकरणात भर घातली होती. मात्र, आताच्या महानगरपालिका मध्ये सत्ता असलेल्या शासनकर्त्यांना जवान आणि शेतकऱ्याची गरज उरलेली दिसत नाही म्हणून की काय? जनता भाजी बाजार समोरील जवान व शेतकऱ्याचा पुतळा हटविलेला आहे. शेतकऱ्यांचे व जवानांना संपविण्याचे धोरण भाजप शासनकर्ते दिल्ली पासून ते अकोला पर्यंत राबवित आहेत, त्याचाच एक भाग म्हणून की काय अकोला शहरातील हे शेतकरी व जवानांचे प्रतिष्ठान खलास करण्याचे काम सत्ताधारी अकोला मनपा शासनकर्त्यांनी केले आहे. अशी चर्चा संपूर्ण महानगरात सुरू आहे. एकीकडे सैनिकांचे बलिदान देऊन, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे बलिदान घेऊन सत्ताकारण करणाऱ्या सत्ताधीशांना येणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत अकोल्याचे सुज्ञ मतदार धडा दाखवल्या शिवाय राहणार नाही. हे मात्र तेवढेच खरे, अशी प्रतिक्रिया समाजसेवक गजानन हरणे यांनी दिली आहे.
अकोलावासीयांच्या आठवणी
आता हा 'जय जवान जय किसान' हा पुतळा रस्त्याच्या कडेला धूळ खात पडला आहे.
लाखों अकोलावासीयांच्या 'जय जवान जय किसान' पुतळा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेकांच्या मनातल्या कुपीत या पुतळा बद्दलच्या आठवणी साठवलेल्या आहेत. तर खूप जणांच्या बालपणीच्या सुंदर गोष्टी यात दडलेल्या आहे. यासाठी हा पुतळा जिल्हा व मनपा प्रशासन तसेच राजकीय सत्ताधारी व विरोधी पक्षनेते यांनी अकोलावासीयांच्या भावना जपण्यासाठी हा पुतळाचे जतन करुन त्याच जागेवर स्थापन करावा, अशी मागणी केली आहे.
(वाचकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया comment box मध्ये व्यक्त कराव्यात)
अकोला शहर
जनता भाजी बाजार
जय जवान जय किसान
Akola
disappears
Jai Jawan Jai Kisan
Janata Bazaar
statue
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा