Indian railways: Akola purna: अकोला पूर्णा ब्रॉडगेज मार्गाला 13 वर्षे पूर्ण; लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही मार्ग उपेक्षितच

Akola completes 13 years on purna broad gauge route; The road is still neglected for 13 years (photo:Amol Ingle)







ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणारे अकोला रेल्वे स्थानकाचे नाव भारतात उत्पन्न देणाऱ्या पहिल्या १०० स्थानकामध्ये आहे. अकोला स्थानकाहुन दक्षिण मध्य रेल्वेचा हैद्राबाद -  अजमेर मार्ग सुद्धा जोडला आहे. भारतातील रेल्वे मार्गांचा विकास करण्या अंतर्गत अकोला - पूर्णा मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेज मध्ये करण्यात आले. 


"तेरा वर्षांपूर्वी 11 नोव्हेंबर 2008 ला ब्रॉडगेज सुरु करून पहिली पूर्णा - अकोला पॅसेंजर या मार्गावर धावली. लोकप्रतिनीधी व प्रवाश्यांची उत्साहाने या पॅसेंजरचे स्वागत केले होते. ब्रॉडगेज झाल्यानंतर या मार्गाचा विकास होईल अशी प्रवाश्यांची अपेक्षा होती. मात्र हा मार्ग जाणीवपुर्वक (?) दुर्लक्षित राहिला. प्रवाश्यांचा प्रतिसाद, रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्या असतांना सुद्धा 13 वर्ष उलटूनही या मार्गावर अपेक्षित विकास अद्यापही झाला नाही."  

                              ॲड. अमोल इंगळे 

                           रेल्वे प्रवाशी संघटना 







लोकप्रतिनिधींची उदासीनता 



केंद्रात तसेच राज्यातील सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर सुद्धा लोकप्रतिनिधीं कडून मार्गाचा विकास केला नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी लोकप्रतिनिधींकडे मागणी करून सुद्धा याबाबत कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाही. गेल्या तेरा वर्षात या मार्गावर लोकप्रतिनिधींकडून अकोला वरून सुरुवात होणारी एकही नवीन ट्रेन सुरू करण्यात आली नाही.




प्रलंबित मागण्या 


-  पॅसेंजर ची संख्या वाढविण्यात आलेले नाही.


- अकोला स्थानकांवर पिट लाईन बनवण्याची मागणी. 


- नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे अकोला स्थानकावरून सुरु करण्याची मागणी. 


-  साप्ताहिक सुरू असलेल्या रेल्वे यांना नियमित करणे तसेच स्पेशल च्या नावावर सुरू असलेल्या रेल्वे नियमित करण्यात आल्या नाही.


- अकोला - अकोट मार्ग सुरू केला नाही.


- दक्षिण मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडण्यात आलेला नाही.


- उत्तर - पूर्व भारत करिता थेट गाडी अद्याप मिळाली नाही.


- अमरावती पुणे एक्सप्रेस, अकोला - परळी, अकोला - पूर्णा पॅसेंजर पूर्ववत सुरु करण्यात आल्या नाहीत. 


- हैद्राबाद - नागपूर -  इटारसी व मिरज - पुणे  - भुसावळ मार्ग साप्ताहिक धावणाऱ्या रेल्वे  हैद्राबाद - अकोला -  खांडवा मार्ग सुरु कराव्यात.

टिप्पण्या