Indian Railway-Jabalpur:surat: खंडवा-अकोला-नांदेड मार्गे जबलपूर ते तिरुपती ट्रेन सुरू करण्याची मागणी; सुरत एक्सप्रेस 25 पासून पूर्ववत





अकोला: पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर रेल्वे स्थानका वरून खंडवा भुसावळ अकोला नांदेड हैदराबाद मार्गे तिरुपती बालाजी धार्मिक स्थळापर्यंत रेल्वे सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण दक्षिणेला असलेल्या तिरुपती बालाजीचे लाखो भक्त जबलपूर, कटनी, प्रयागराज, इटारसी, खंडवा भागात राहतात. या लाखो भाविकांना तिरुपती बालाजी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी थेट सुविधा नाही.  या ट्रेनसोबतच नांदेडच्या सचखंड गुरुव्दारापासून जबलपूर , खंडवा येथील ओंकारेश्वर आणि हिंगोली औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग यांनाही थेट कनेक्टिव्हिटी असेल आणि केरळ, रामेश्वरम पर्यटन आणि धार्मिक स्थळांचीही सोय होईल.  यासाठी जबलपूर ते खंडवा नांदेड हैदराबाद मार्गे तिरुपती बालाजी धार्मिक स्थळापर्यंत ट्रेन सुरू करावी, अशी मागणी राकेश भट्ट डीआरयुसीसी (DRUCC) सदस्य दक्षिण मध्य रेल्वे यांनी महाव्यवस्थापक पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



सुरत एक्सप्रेस 25 नोव्हेंबर पासुन पुर्ववत


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून बंद असलेली सुरत - अमरावती सुरत एक्सप्रेस 25 नोव्हेंबर पासुन पुर्ववत सुरु होत आहे .




सुरत- अमरावती एक्सप्रेस (गाडी क्र.9125 आणि 9126 ) नेहमीप्रमाणे आठवड्यातुन तीनदा धावेल सुरतहुन अमरावतीकडे ( रवि,गुरु ,शुक्र ) जाण्यासाठी दुपारी १२.२० मि.सुटेल दोंडाईचा स्थानकांवर दुपारी ३.१५ मि.निघेल अमरावती येथे रात्री १०.२५ मि.पोहचेल. 




अमरावतीहुन (सोम,शुक्र,शनी ) सकाळी ९.०५ मि. निघेल दोंडाईचा स्थांनकावर दुपारी ३.५८ मि.निघुन सुरत स्थांनकावर संध्याकाळी ७.०५ मि. पोहचेल.




प्रवाशांनी कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत असल्याने आपली सुरक्षा स्वतः करुन आगावु तिकीटे आरक्षीत करुन सोशल डिस्टंन्स ,मास्क व सँनिटायझरचा वापर करुन लाभ घ्यावा, असे आवाहन प्रविण महाजन, दोंडाईचा सदस्य रेल्वे सल्लागार समिती पश्र्चिम रेल्वे मुंबई यांनी केले आहे.






टिप्पण्या