- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
hunger-strike-Ravikant-Tupkar: तुपकरांच्या घरासमोर नागपूर व बुलडाणा पोलिसांचा पहारा; सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार,रविकांत तुपकर यांची ठाम भूमिका
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Nagpur:अन्नत्याग आंदोलन
ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: नागपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांनासाठी छेडण्यात आलेलं अन्नत्याग आंदोलन काल नागपूर पोलिसांनी रात्री मोडून काढले. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंडपामधून ताब्यात घेत हे आंदोलन बंद करण्यात भाग पाडलं. आंदोलन मोडून रविकांत तुपकर यांना पोलिस ताब्यात घेऊन उशिरा रात्री बुलढाणाच्या दिशेने निघाले होते. आज सकाळी बुलढाणा येथे आणून सोडले.
शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्या आरोप यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. अनेक राजकीय पक्षांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, शेतकऱ्यांच्याच आंदोलनमुळे कोरोना वाढतो का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
येत्या दोन दिवसात विदर्भात संघटनेच्या वतीने विविध आंदोलन करून 20 नोव्हेंबरला गाव बंद करणार असल्याचा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला. तर झालेल्या अटेकचा त्यांनी निषेध नोंदवला आहे.
निवासस्थानासमोर अन्नत्याग सत्याग्रह
" नागपूर येथील अन्नत्याग आंदोलन दरम्यान काल रात्री 10.30 वा. नागपूर पोलिसांनी मला ताब्यात घेऊन आज सकाळी बुलडाणा येथील माझ्या निवासस्थानी आणून सोडले. माझ्या घरासमोर नागपूर व बुलडाणा पोलिसांचा पहारा आहे. पोलिसांनी अशा कितीही कारवाया केल्या तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, अशी माझी भूमिका आहे."
रविकांत तुपकर
शेतकरी नेते
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा