Honoring-students-Marathi- Coaching-Class-Akola-city: पठाण सर मराठी कोचिंग क्लास मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Honoring meritorious students in Pathan Sir Marathi Coaching Class




अकोला : शहरातील प्रख्यात मराठी प्रशिक्षक प्रा.मोहसीन पठाण यांच्या हस्ते घेण्यात आलेल्या "पठाण सर मराठी कोचिंग क्लास' मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यामध्ये वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष महमूद उस्मान, सामाजिक कार्यकर्ता आणि कोरोना योद्धा डॉ. आतिफ इक्बाल, फिएक्स इन्फोटेकचे संचालक इंजीनियर आवेज सिद्दीकी, महिला मुक्ती मंचचे शहराध्यक्ष इसरार अहमद, प्रा.एजाज खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्राध्यापक पठाण यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी ही मुस्लिम समाजात अत्यंत कठिन मानली जाते, मात्र तसे नाही, आमच्याकडे पहिल्या वर्गापासून विविध क्षेत्रांतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी सुद्धा मराठी शिकत आहे आणि योग्यरित्या मराठी बोलतात, त्यांनी मराठी कठिन असण्याच्या कल्पनेला मिथ म्हटले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा.परवेझ अख्तर म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषा अत्यंत महत्त्वाची आहे त्याकडेही लक्ष द्या तसेच स्पर्धा परीक्षेची पण तयारी करा. प्रमुख उपस्थिती डॉ.अतिफ यांनी यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक असल्याचे सांगितले,प्रा.एजाज यांनी शिक्षण जीवनातील सर्वात महत्वाचे कार्य असल्याचे सांगितले, यावेळी इंजीनियर आवेज सिद्दीकी यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाव्यतिरिक्त इतर कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच अन्य कौशल्ये कडे लक्ष द्या जेणेकरून तुम्ही जगभरात तुमच्या सेवा देऊ शकता, या डिजिटल युगात हे खूप सोपे झाले आहे. वरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अनुसरून विविध पारितोषिकेही देण्यात आली, तसेच उपस्थित मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.




टिप्पण्या