examination-post-agricultural assistant-postponed-Akola:कृषी सहाय्यक पदासाठी होणारी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली;परीक्षार्थी संभ्रमात

The examination for the post of agricultural assistant is postponed at that time; the students were confused (file photo)




अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे रविवार 14 नोव्हेंबर रोजी होणारी कृषी सहाय्यक पदाची परीक्षा एस टी बस कर्मचारीच्या संपामुळे ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली असल्याने परीक्षार्थी संभ्रमात पडले आहे.




या परीक्षेसाठी राज्यातून, परराज्यातून आणि ग्रामीण भागातून सुमारे साडे सहा हजार विद्यार्थी येणार होते. 



रेल्वेच्याही मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण होणार होते. यासंदर्भात कृषी विद्यापीठाने परिस्थिती लक्षात घेत आणि विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे. मात्र पुढील तारीख अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षार्थीना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 



दरम्यान,पुढील तारीख काही दिवसातच जाहीर करण्यात येणार असल्याचे सुरेंद्र काळबांडे, कुलसचिव, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या