Diwali 2021:True Lakshmi Pujan: खरं लक्ष्मीपूजन! नांदी नव्या युगाची; गजानन हरणे यांनी लक्ष्मीपूजन दिनी केले गृहलक्ष्मी युगेश्वरी यांचेही पूजन

                Positive story



True Lakshmi Pujan! The dawn of a new age;  Gajanan Harne performed Lakshmi Pujan on the day and also worshiped Grihalakshmi Yugeshwari




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: भारतीय स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप मानतात. 'घरची लक्ष्मी' 'गृह लक्ष्मी' असा नेहमीच उल्लेख केला जातो. मात्र, अपवाद वगळता अनेक ठिकाणी लक्ष्मी स्वरूप स्त्रियांना कोण्याना कोण्या प्रकारे अपमानास्पद वागणूक दिल्या जाते. शारीरिक मानसिक छळ केला जातो. विटंबना केली जाते. पण समाजाचे  हे चित्र बदलायचे असेल तर केवळ श्री माता लक्ष्मीची मूर्ती पूजा न करता गृहलक्ष्मीची देखील प्रत्यक्ष पूजा करून तिला सन्मानित केले पाहिजे, असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अकोल्यातील खडकी येथे राहणारे समाज सुधारक गजानन हरणे यांनी दिवाळी लक्ष्मी पूजन दिनी दिला. पत्नी सौभाग्यवती युगेश्वरी हरणे यांचा मान सन्मान पूजा करून हरणे यांनी खऱ्या अर्थाने लक्ष्मी पूजन केले. ही नव्या युगाची नांदीच म्हणावी लागेल.




खरी दिवाळी, खरं लक्ष्मीपूजन



खरी दिवाळी, खरं लक्ष्मीपूजन तर तेव्हा साजरी होईल, जेव्हा आपल्या घरातली प्रत्येक स्त्री प्रमाणेचं समाजातील सर्वच स्त्रियांचा सन्मान होईल. त्यांचा आदर होईल, त्यांनाही कमी न लेखता त्यांनाही समान वागणुक मिळेल. स्री-पुरुष समान या न्यायाने त्यांनाही घरात, समाजात प्रत्येक बाबींमध्ये आपलं मत प्रकट करता येईल. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या डोळ्यावर टाकलेली झापड काढुन टाकली तर, असे मत गजानन हरणे यांनी व्यक्त केले.




देशाचा गौरव प्रतिभावान महिला



पुरुषसत्ताक वृत्तीने आधीपासूनच महिलांना मर्यादा पाडून ठेवल्यात त्यांनी चूल आणि मूल या पलीकडे जायला नको असं बींबवलं गेलं या विरुद्ध जर कोणी वागलं तर त्यांना एका गुन्हेगाराप्रमाणे वागणूक मिळत असे...पण आता हे चित्र बदलत असतांना आपणांस दिसत आहे आज अनेक मोठ-मोठया पदांवर महिला विराजमान आहेत असं आपल्याला दिसत आहे. आपण स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रगती पथावर यशस्वी वाटचाल करतांना पाहतो. तसेचं महिला ह्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध स्तरावरील उच्चस्तरावर काम करत आहेत पण बऱ्याच खेड्यापाड्यात अजूनही महिलांना जुन्याचं बुरसट विचारसरणी प्रमाणे वागणूक मिळत आहे. त्यांना यामधून बाहेर काढणे आवश्यक आहे.  कारण त्यामधूनचं कोणी जिजाऊ, झांशीची राणी, सावित्री,रमाई,अहिल्या असेल त्यांना या चौकटीच्या बाहेर काढणं आपलं काम आहे याचा अर्थ समाजाच्या समानतेच्या सर्व मर्यादा सांभाळून हे जर आपण करु शकलो तर नक्की यामधून पुन्हा कल्पना चावला,पी.व्ही. सिंधू,मेरी कोम यांसारख्या अनेक आपल्या देशाच्या गौरव असलेल्या प्रतिभावान महिला तयार होतील, असे गजानन हरणे म्हणाले.





स्त्रीला बंधनातून मुक्त करायचं आहे


आज ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…

ज्याला स्त्री 'बहीण' म्हणून कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला…

ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली तो राधेचा "श्याम" झाला…

आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सितेचा "राम" झाला…,असे म्हणतात. म्हणूनच आता आपल्याला स्त्रीला बंधनातून मुक्त करायचं आहे त्यांना त्याच्या परीने त्यांच जीवन जगू द्यायचं स्वातंत्र्य द्यायचं आहे. हे जर आपण स्वतः करू शकलो तर मला तरी वाटत भविष्यात महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम घेण्याची गरजचं भासणार नाही. असं म्हटलं जातं आपण नुसतं बोलतोचं पण करत काहीच नाही म्हणून याकडे वाटचाल करतांना सुरुवात मी माझ्यापासून केली म्हणजेचं घरातील महिलांना सन्मान देण्याचं काम केलं, असे गजानन हरणे यांनी सांगितले.


युगेश्वरी हरणे यांचा सार्थ अभिमान 


माझी पत्नी युगेश्वरी हरणे पंचायत  समितीच्या सदस्य पदावर काम केले आहे आणि बचत गट माध्यमातून सुद्धा काम करीत आहे. गायिका म्हणून सुद्धा काम करीत आहे. म्हणून मी हे नुसतं बोलत नाही आहे तर या दिशेने प्रगतीचे पाऊल मी टाकले आहे. त्याची वाटचाल मी स्वत:च्या घरापासून करत आहे ... याचा मला सार्थ अभिमान असल्याचे हरणे म्हणाले.



सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग



‘सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग’ हे आपण सोडुन दिलं पाहीजे. समविचाराने लोकांनीही आता नव्या युगाची सुरुवात  करायला पाहिजे, अशी अपेक्षा हरणे यांनी व्यक्त केली.


                            

                      

टिप्पण्या