Big Breaking-Farmlaws-politice: प्रकाशपर्वला पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागून कृषी कायदे रद्द करत असल्याची केली घोषणा



On Prakash Parva, Prime Minister Modi announced that he was repealing the agricultural laws by apologizing to the farmers (photo:social media)




नवी दिल्ली: मोदी सरकारने तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना आपण तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. 



यावेळी मोदी यांनी, "आम्ही दोन वर्षासाठी कायदे सस्पेंड करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की, आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आम्ही काही सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे." असे म्हणाले.


आगामी पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली गेली होती. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आता जनमाणसात होत आहे.




श्री गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेना दिल्या शुभेच्छा


दरम्यान, पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.  श्री गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या विशेष प्रसंगी, श्री मोदी यांनी त्यांच्या पवित्र विचारांचे आणि उदात्त आदर्शांचे स्मरण केले आहे.


 


आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;


 


 "श्री गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या विशेष प्रसंगी, मी त्यांच्या पवित्र विचारांचे आणि उदात्त आदर्शांचे स्मरण करतो. एक न्यायी, दयाळू आणि सर्वसमावेशक समाजाची त्यांची दृष्टी आपल्याला प्रेरणा देते. श्री गुरु नानक देवजी यांनी इतरांची सेवा करण्यावर दिलेला भरही प्रेरक आहे."






टिप्पण्या