Akola newsletter: ST Employee Protest: ST workers strike:BJP: तर एस टी कर्मचाऱ्यांच्या उद्रेकाला आघाडी सरकारला सामोरे जावे लागेल- आमदार सावरकर





 


अकोला: एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी भाजपाने आज पाठिंबा दिला आहे. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार ‍एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात न घेता केवळ गप्पांचा बाजार करत असून, कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागेल असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे.


आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने आज एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. 



कर्मचाऱ्यांना नाईलाजाने दिवाळी भाऊबीज सणवार असताना सुद्धा संप पुकारावा लागतो त्यांच्या वेदना, अडचणी, भावना असताना सुद्धा परिवार व एसटी लाल परी बचावासाठी त्यांना आंदोलन करावे लागत आहे. त्यांनासुद्धा परिवार असल्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेऊन सर्वांनी राज्य सरकारवर दबाव आणून एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला भाग पाडावे, असे यावेळी आमदार सावरकर यांनी सांगून संपाला पाठिंबा दिला.






अकोला जिल्हा रग्बी संघ निवड चाचणी




अकोला: जिल्हा रग्बी असोसिएशनच्या वतीने दिनांक ८.११.२०२१ रोजी १९ वर्षा आतील निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.



सोमवारी सकाळी १०.०० वाजल्यापासून ज्ञान दर्पण इंग्लिश स्कूल खेतान नगर अकोला येथे ही निवड चाचणी होईल. निवड चाचणीतून निवडलेला संघ दिनांक 13 व 14 नोव्हेंबर रोजी भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत. खेळाडूंनी  आधार कार्ड सह उपस्थित राहण्याचे आवाहन रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष प्रेमराज शर्मा व ज्ञानेश्वर ताले अमित मनवर, यांनी पत्रकाद्वारे केले आहे.





*कोरोना अलर्ट*


*आज रविवार दि.७ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

 

*प्राप्त अहवाल-७७*

*पॉझिटीव्ह-एक*

*निगेटीव्ह-७६* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- एक


*अतिरिक्त माहिती* 


आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  त्यात एका मुलाचा समावेश असून तो बार्शीटाकली येथील रहिवाशी आहे.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२७८+१४४३१+१७७=५७८८६*

*मयत-११३९*

*डिस्चार्ज-५६७३७*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१०* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार) 


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*




उद्या दिनांक 08/11/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.




1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट

4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

6)नागरी आरोग्य केंद्र उमरी 

श्री हरी पार्क लहान उमरी पोलीस स्टेशन जवळ

7)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

8) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

9)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत

मनपा शाळा

10) आर  के टी आयुर्वेदिक महाविद्यालय जठारपेठ

11) GMC Akola

       


18+ च्या वरील  नागरिकांकरिता **Covishield*   प्रथम डोस तथा  द्वितीय डोस

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.




1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता Covexin   प्रथम डोस तथा द्वितीय डोस) 

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.




ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील


अकोला महानगरपालिका अकोला.


टिप्पण्या